डिझेलसाठी पैसे नसल्याने
एसटी ची चाके थांबली
१८,००० एसटी बसचा ताफा असणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या एकाच वेळी अनेक संकटाचा सामना करत आहे. डिझेलसाठी पैसे नसल्याने रद्द केलेल्या एसटी बसवर असणाऱ्या चालक आणि कंडक्टरना रजा घेण्यास सांगण्यात आल्याचा आरोप युनियनने केला आहे. हजारो प्रवासी गणेशोस्तवासाठी जाण्यासाठी रांगेत उभे असतानाही, गेल्या काही महिन्यांपासून पगाराच्या विलंबामुळे एसटी कामगारांना पैशांची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे.
प्रवासी बसवर दरड कोसळली,
४० जण ढिगाऱ्याखाली
हिमाचल प्रदेशमधील किन्नूरमध्ये एका प्रवासी बसवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांनी भरलेल्या बसवर ही दरड कोसळली आहे. तसेच या दरडीमध्ये इतर अन्य वाहनेही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये किमान ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता पोलीस उपायुक्त होसेन सिद्दकी यांनी व्यक्त केलीय.
नाशिकच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी
वैशाली झनकर यांना लाच घेताना अटक
नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली पंकज वीर- झनकर यांच्यासह तीन जणांना ८ लखाची लाच घेतांना पकडण्यात आले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या पथकाला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाकार्य केले. तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता आरोपी पंकज रमेश दशपुते (राजेवाडी येथील प्राथमिक शिक्षक) यांनी वैशाली वीर झनकर यांचे करिता नऊ लाख रुपयाची मागणी केली. दरम्यान झनकर फरार झाल्या आहेत.
नाशिकमध्ये घरात
घुसून महिलांना पेटवले
नाशिकच्या मखमलाबाद रस्त्यावरील शिंदेनगर येथे रिक्षा चालकाने इमारतीतील घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यात दोन महिला गंभीर भाजल्या आहेत. वयोवृद्ध व्यक्ती व दोन मुले बचावली. आगीत घरातील बरेचसे साहित्य जळून खाक झाले.
केरळमध्ये तिसऱ्या
लाटेला प्रारंभ
देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरून काहीसा दिलासा मिळत नाही, तोच आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक आणखी वाढतांना दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सध्या भितीदायक वातावरण आहे. केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या भयंकर स्थिती येण्याचा शक्यता आहे, अशी भीती केरळच्या आठ जिल्ह्यांचा दौरा केलेल्या सहा सदस्यीय केंद्रीय पथकाने व्यक्त केली आहे. त्यामुळे केरळमध्ये तिसऱ्या लाटेला प्रारंभ झाला आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तान मध्ये नासधूस केलेल्या
मंदिराची दुरुस्ती 90 जणांना अटक
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात गेल्या नासधूस झाली होती. या मंदिराच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकरणी ९० लोकांना अटक करण्यात आली आहे. पंजाब प्रांताच्या रहीम यार खान जिल्ह्याच्या भोंग परिसरात बुधवारी गणेश मंदिरावर जमावाने हल्ला केला होता. एका स्थानिक मदरशाला कथितरित्या अपवित्र केल्याच्या आरोपावरून हा हल्ला करण्यात आला होता.
राज्यातील शाळा
पुन्हा सुरू होणार
राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत अखेर राज्य सरकारने आदेश काढ आहेत. त्यानुसार शहरी भागात ८वी ते १२वी तर ग्रामीण भागात ५वी ते ७वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
एटीएम मध्ये पैसे नसतील तर
संबंधित बँकेला होणार दंड
एटीएममध्ये वेळेत पैसे भरले नाही, तर – संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावणार असल्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. एटीएममध्ये रोख रक्कम नसल्याने अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलास ळण्याची शक्यता आहे. महिन्यात एका एटीएममध्ये दहा तासांहून अधिक वेळेपर्यंत पैसे भरले गेले नाहीत, तर दंड लावला जाणार आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
पाच लाख किलोमीटर प्रवास
करत बापाने मुलाला शोधले
चीनमध्ये आश्चर्यकारक घटना घडण्याचे प्रमाण काही कमी नाही. अलीकडेच एका बापाला त्याचा मुलगा हरविल्यानंतर २४ वर्षांनी सापडला आहे. त्यामुळे ही घटना जगभरात चर्चेला येत आहे. आपल्या मुलाला शोधण्यासाठी या बापाने जगभरात ५ लाख किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला. अखेर त्यांना २६ वर्षाचा मुलगा भेटला.
भाजपने देशाची अवस्था इंग्रजांपेक्षा
वाईट केली : नाना पटोले
शेतकरी, युवा, महिलांच्या विरोधा केंद्र सरकार आहे. इंग्रजांपेक्षा वाईट परिस्थिती भाजपने देशाची केली. भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक येथे केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकाही केली. देशावर संकट येते तेव्हा सगळ्यांना एकत्र करण्याचे काम होत होत असे, पण, हेरगिरी मुद्दया बद्दल उत्तर द्यायला देशाचे प्रधानमंत्री समोर येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंदिर बंद ठेवून बार सुरू
करणं हेच सरकारचं धोरण
मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे काही नवीन नाही. मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे. त्यामुळे त्यात काहीच नवीन नाीही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
सदाभाऊ खोत यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराला
आजी-माजी विद्यार्थ्यांचा विरोध
पत्रकारितेच्या शिक्षण क्षेत्रात राज्यभरात नाव असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा वाद आता चांगलाच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रानडे इन्स्टिट्यूटच्या मुद्द्यावरुन युवा सेनेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली. इन्स्टिट्यूटच्या जागेवर शॉपिंग सेंटर बांधण्याचा डाव असल्याचा आरोप युवा सेनेनं केलाय.
स्वयंसहाय्यता गटांसाठी हमीमुक्त
कर्जाची मर्यादा आता 20 लाख रुपये
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दीनदयाल अंत्योदय योजना (DAY) राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (NRLM) अंतर्गत स्वयंसहाय्यता गटांसाठी (SHGs) तारण किंवा हमीमुक्त कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये केली. केंद्रीय बँकेने सोमवारी याबाबत अधिसूचित केले. डे-एनआरएलएम (डीएवाय-एनआरएलएम) ही गरीब, विशेषतः महिलांसाठी मजबूत संस्था उभारून गरिबी निर्मूलनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे. या संस्थांना सर्वसमावेशक आर्थिक सेवा आणि उपजीविकेचा प्रवेश मिळतो.
पतीच्या अटकेनंतर शिल्पा
पहिल्यांदा व्हर्चुअल ऍपियरेंस देणार
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात 19 जुलै रोजी अटक केली. पतीच्या अटकेनंतर शिल्पा पहिल्यांदा व्हर्चुअल ऍपियरेंस देणार आहे. सध्या या महत्त्वाच्या कारणामुळे शिल्पा चर्चेत आहे. या लाईव्ह व्हिडिओमध्ये फक्त शिल्पा उपस्थित राहणार नाही, तर या कार्यक्रमामध्ये अन्य सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहे. लाईव्ह इव्हेन्टमध्ये हे सर्व सेलिब्रिटी एका स्क्रिनवर दिसणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 सुमारास हा इव्हेन्ट फेसबुकवर ग्लोबली स्ट्रीम होणार आहे.
खेळाडूवर मजुरी
करण्याची वेळ
टीमला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात सहभागी असलेल्या खेळाडूवर मात्र सध्या खूप वाईट परिस्थिती ओढवली आहे. या खेळाडूला स्वत:चं पोट भरण्यासाठी मोल मजुरी करण्याची वेळ आली आहे. 2018 मध्ये दृष्टिहीनांसाठी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा हा खेळाडू एक भाग होता. शारजाह येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्याच्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला. मात्र याच खेळाडूवर आता स्वत:चं पोट भरण्यासाठी मोलमजुरी करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तो मजूर म्हणून काम करत आहे.
SD social media
9850 60 3590