इतिहास घडला ! भारताच्या नीरज चोप्राने मिळविले भालाफेकीत सुवर्णपदक
टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय आव्हानाच्या अखेरच्या दिवशी (शनिवारी, ७ ऑगस्ट) भारताचा अखेरचा ऍथलिट भालाफेकपटू नीरज चोप्रा सहभागी होता. सर्व भारतीयांना त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. त्याने ही अपेक्षा पूर्ण करत भारताला ऑलिम्पिक इतिहासात ऍथलेटीक्स प्रकारात पहिलेवहिले पदक मिळवून दिले. त्याने या ऑलिम्पिकमधील भारताचे पहिले व इतिहासातील दुसरे सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.
अशी केली ती ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीत ८६.६५ मिस्टर भालाफेक करून नीरजने अंतिम फेरीसाठी पात्र मिळवले होते. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली.
दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला.
अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.
पुनियानं भारताला मिळवून दिले ब्राँझ पदक
ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि कझाकिस्तानच्या दाऊलेत नियाझबेकोव यांच्यात ब्राँझ पदकासाठी लढत झाली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत बजरंग पुनियाने कांस्य पदकावर नाव कोरले. सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंगने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली.
जॉन्सन अँड – जॉन्सनच्या
सिंगल डोस लशीला मंजुरी
केंद्र सरकारने जॉन्सन अँड – जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला मंजुरी दिली आहे. आतापर्यंत देशात कोरोनासाठी दोन डोसच्या लशी होत्या. पण, आता एक डोसची लस उपलब्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती ट्विट करुन सांगितली आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, India expands its vaccine basket! जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड -19 लशीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. भारताकडे 5 EUA लस आहेत. कोविड विरुद्ध देशाच्या लढाईला आणखी चालना मिळेल.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. आणखी तीन वर्षांकरिता ही नियुक्ती असणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग कायदा १९९० ( १९९० च्या २०) च्या कलम ३ अन्वये केंद्र सरकारने ही नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती ७ ऑगस्ट २०२१ पासून लागू होईल. त्यांची ही नियुक्ती, त्यांच्या वयाच्या ६५ वर्षांपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी होईल तो पर्यंत लागू राहणार आहे. याअगोदर रेखा शर्मा या ऑगस्ट २०१५ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य बनल्या आणि ७ ऑगस्ट २०१८ रोजी आयोगाच्या अध्यक्ष होण्यापूर्वी २९ सप्टेंबर २०१७ पासून त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष (प्रभारी) होत्या.
१७ ऑगस्टपासून शाळा
सुरू करण्याबाबत चाचपणी
करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या गावांमधील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केल्यानंतर निर्बंध शिथिल झालेल्या नगरपालिका, नगर परिषदा आणि महापालिका क्षेत्रातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्गही १७ ऑगस्टपासून सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्गही सुरू करण्यात येणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष
बदलण्याच्या चर्चेला वेग
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौ-यावर असून ते भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत आहे. या भेटीत आगामी महानगरपालिका निवडणुकीची व्यूहरचनेसाठी हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या दौ-या निमित्त मात्र प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चाही रंगली आहे. या पदासाठी आशिष शेलार, व चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान आशिष शेलार यांनी या चर्चेला काही अर्थ नसल्याचे सांगितले. पक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत असल्याचे ते म्हणाले.
ई-रूपी (e- RUPI) प्रणालीच्या
माध्यमातून आर्थिक व्यवहार शक्य
कॅशलेस आणि विनासंपर्क आर्थिक व्यवहार वाढविण्याच्या दृष्टीने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ई-रूपी (e- RUPI) प्रणाली कार्यान्वित केली आहे. ई-रूपी हे डिजिटल व्हाउचर असून, लाभार्थ्यांना त्यांच्या फोनवर एसएमएस किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातून पाठविले जाते. हे एक प्रीपेड व्हाउचर आहे. उपलब्ध असलेल्या कोणत्याही ठिकाणी व्हाउचरचा वापर केला जाऊ शकतो.
गोल्फपटू अदिती अशोकचे
पदक थोडक्यात हुकले
क्रीडा स्पर्धेचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या आॕलिम्पिक मधौये शनिवारी गोल्फ स्पर्धेत भारतीय गोल्फपटू अदिती अशोकचे पदक थोडक्यात हुकले. कोणतीही आशा नसताना अदितीने जबरदस्त कामगिरी केली. एका स्ट्रोकमुळे तिचे पदक हुकले. ती चौथ्या क्रमांकावर राहिली. अदितीला पदक मिळाले नसले तरी शानदार खेळीने अव्वल भारतीय गोल्फपटूंच्या यादीत तिचे नाव घेतले जाईल.
दिल्लीतील नंद नगरी भागात
दोन मजली इमारत कोसळली
दिल्लीतील नंद नगरी भागात एक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन जवानांकडून बचाव कार्य सरु असून इमारत दुर्घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखालून दोन जणांना सुखरुपरित्या बाहेर काढलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
डेल्टा व्हॅरिएंटचे रुग्ण आढळल्यामुळे
नाशिक जिल्ह्यात चिंता वाढली
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ५१६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १ हजार ७३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यात आ कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आत झाली आहे. पण, काल डेल्टा व्हॅरिएंटचे ३० रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली आहे.
धुळे मतदारसंघातील ५ रस्त्यासाठी
९३९ कोटी रुपयांचा निधी
भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक – मंत्रालयाने धुळे लोकसभा मतदारसंघातील ५ रस्त्यांच्या कामांसाठी ९३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ सुभाष भामरे यांनी दिली आहे. धुळे लोकसभा कार्यक्षेत्रातील अनेक र वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिल्याने या रस्त्यासाठी सततचा पाठपुरावा केल्याने या रस्त्यांना ९३९ कोटी रुपये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे.
अमिताभ बच्चन यांचे घर उडवून
देण्याची धमकी, अन पोलिसांची धावपळ
मुंबई पोलिसांना रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने दादर, भायखळा, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील बंगला उडवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. या फोन नंतर त्या व्यक्तीने सांगितलेल्या सर्व ठिकाणी रात्रभर शोध घेण्यात आला मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी
२६ विमा कंपन्या एकत्र येणार
रस्ता अपघातातील पीडितांच्या नुकसान भरपाईच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी लवकरच ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला जाणार आहे. यामध्ये पीडित, पंच, पोलिस आणि विमा कंपन्यांना एकत्रितरित्या जोडले जाणार आहे. देशातील सर्व २६ विमा कंपन्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या विचारावर सहमती दर्शविली आहे.
पत्नीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे
मी अत्यंत दु: खी : हनी सिंग
हनी सिंगने अधिकृत निवेदनात लिहिले की, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गेल्या २० वर्षांपासूनच्या पत्नीने केलेल्या खोट्या आणि वाईट आरोपांमुळे मी अत्यंत दु: खी आहे. सदर कथित आरोप गंभीर व निंदनीयही आहेत. यापुर्वी माझ्या गाण्यांवर कठोर टीका झाली असून माझ्या आरोग्याबद्दलची नकारात्मक मीडिया कव्हरेज प्रसिद्ध झाले असूनही मी कधीही सार्वजनिक निवेदन किंवा प्रेस नोट जारी केली नाही.
SD social media
9850 60 3590