मीराबाईच्या उपचार आणि ट्रेनिंगसाठी पंतप्रधानांनी केली मदत – मणीपूर CM

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावून इतिहास रचला. मणिपूरच्या मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले. चानूच्या यशस्वी कामगिरीनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मोठा खुलासा केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाईला जिंकण्यासाठी महत्त्वाची मदत केली. पंतप्रधानांनीच मीराबाईला उपचारांसाठी अमेरिकेत पाठवले. त्याचप्रमाणे त्यांनी मणीपूरच्या आणखी एका खेळाडूला देखील मदत केल्याचे खुलासा बिरेन सिंह यांनी केला.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, ‘मी या आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतली तेव्हा त्यांनी मीराबाईला केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानले.त्याचप्रमाणे मीराबाई चानूने देखील सत्कार समारंभावेळी बोलताना पंतप्रधानांकडून मिळालेल्या मदतीचा उल्लेख करत त्यांचे आभार मानले. बिरेन सिंह यांनी पुढे असे म्हटले की, पंतप्रधानांनी मीराबाईला केलेली मदत पाहून मला आश्चर्य वाटले. पंतप्रधान मोदींनी जर मीराबाईच्या मांसपेशींच्या ऑपरेशनसाठी त्याचप्रमाणे प्रॅक्टिससाठी अमेरिकेला पाठवले नसते तर मीराबाई हे यश मिळवू शकली नसती. मोदींनी मीराबाईला मदत करत तिची मोठी समस्या छोटी केली. पंतप्रधानांनी मीराबाईला मदत केल्याचे समजल्यावर मणिपूरच्या लोकांना आनंद झाला होता,असे त्यांनी म्हटले.

मीराबाईला चानूला अनेक दिवसांपासून पाठ दुखीची समस्या होती. ही माहिती पंतप्रधान मोदी आणि पीएमओला मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वत: मीराबाईच्या उपचारांचा आणि ट्रेनिंगचा खर्च उचलला आणि मीराबाईला अमेरिकेला पाठवले. त्याचप्रमाणे मोदींनी मणिपूरच्या आणखी एका खेळाडूला मदत केल्याचा उल्लेख देखील बीरेन सिंह यांनी केला मात्र त्याचे नाव त्यांनी सांगितले नाही.

मीराबाई चानूने मोदींचे मानले आभार

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींचे आभार मानले. मीराबाई म्हणाली, पंतप्रधान मोदींनी मला फार कमी वेळात अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला पाठवले होते. एका दिवसात सर्व तयारी पूर्ण झाली. पंतप्रधानांमुळे मला चांगले प्रशिक्षण मिळाले आणि म्हणून मी पदक मिळवण्यात यशस्वी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.