राज्यातील 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रशासकीय कामाचा भाग म्हणून नियमित बदल्यांच्या प्रक्रियेला राज्य सरकारने निश्चित कालमर्यादा दिलीय. त्यामुळे या कालावधीत वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आलाय. राज्यातील 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. या प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलीय.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे :

  1. संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.
  2. अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.
  3. मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.
  4. सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.
  5. प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.
  6. कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.
  7. जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.
  8. एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.
  9. एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.
  10. राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.
  11. जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.
  12. रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.
  13. एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.
  14. दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.