टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी हॉकी, तिरंदाजी आणि बॅडमिंटनमधून चांगली बातमी मिळाली, तर बॉक्सिंगमध्ये भारताच्या वाट्याला निराशा आली. देशाची स्टार बॉक्सर मेरी कोमला राऊंड ऑफ 32 मध्ये पराभव पत्करावा लागला. शूटऑफमध्ये तिरंदाज दीपिका कुमारीचा विजय मिळवला आहे.
पीव्ही सिंधू, अतानू दास आणि सतीश कुमार यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 30 जुलै म्हणजेच आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारताचे काही खेळाडू पदकापासून एख पाऊल दूर असतील. पीव्ही सिंधू आणि दीपिका कुमारी सारख्या स्टार खेळाडूंवर देशवासियांच्या नजरा असतील. भारतीय महिला हॉकी संघ शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. मात्र, महिला संघ पुढील फेरी गाठण्याची अजिबात शक्यता नाही.
दीपिकाने 6-5 असा सामना जिंकला
शूटिंगमध्ये दीपिकाने हा रोमांचक सामना 6-5 ने जिंकला. ROC च्या पारोव्हाने 07 गुण मिळवताना दीपिकाने परिपूर्ण 10 लावत सामना जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.
अॅथलॅटिक्स : अविनाश साबळे सातव्या स्थानावर
अविनाश साबळे 3000 च्या स्टीपलचेस रेसमध्ये सातव्या स्थानावर आहे. त्याने 08: 20.20 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रत्येक हीटमधील पहिले तीन पुढच्या फेरीत प्रवेश करतील. याखेरीज उर्वरित खेळाडूंमधील अव्वल सहा वेळेचे खेळाडूही पुढील फेरीसाठी पात्र ठरतील.