बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अटक झाली आहे. राज कुंद्रावर अश्लील फिल्म तयार करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली असून 23 तारखेपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्स आणि ट्रोल करण्यास सुरुवात झाली. राज कुंद्राच्या अटकेनंतर क्रिकेटपटू देखील अडचणीत सापडला आहे.
टीम इंडियाचा खेळाडू अजिंक्य रहाणे आपल्या एका जुन्या ट्वीटमुळे अडचणीत येणार का अशी शंका उपस्थित होत आहे. अजिंक्य रहाणे याने केलेलं ट्वीट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रहाणेला ट्रोल केलं जात आहे.
अजिंक्य रहाणे-राज कुंद्रा यांचं जुनं ट्वीट व्हायरल अजिंक्य रहाणे यांचे एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे. रहाणेने 19 ऑक्टोबर 2012 रोजी राज कुंद्राला टॅग करत एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये असं लिहिलं होतं की, ‘सर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. या ट्वीटवर कुंद्राने रहाणेचे आभार मानले होते. त्यावर रिप्लाय देताना राज पुढे म्हणाला होता की तू एकदा येऊन लाईव्ह बघ आणि त्यानंतर रहाणेने ‘हो, मी नक्की येईन’ असा रिप्लायही केला होता.