मोदी सरकारची, प्रधानमंत्री जन धन
लूट योजना : राहुल गांधी
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीवरून सरकारवर निशाणा साधला. ही ‘प्रधानमंत्री जन धन लूट योजना’ असल्याचे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. २०१४ मध्ये मोटारसायकल, कार, ट्रॅक्टर आणि ट्रकच्या पेट्रोल किमतीची तुलना करणारा आलेख त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
श्रीमंत भारतीयांच्या यादीत
मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर
फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतातील अनेक दिग्गजांनी आपले स्थान निर्माण केले आहे. श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एकूण संपत्ती ९०.७ अब्ज डॉलर आहे. अंबानी हे जगातील १० व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, गौतम अदानी, आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत.
पंतप्रधान मोदी आणि शरद
पवार यांची दिल्लीत भेट
राज्यात सत्ताधारी आणि विरोधक संघर्ष सुरु असतानाच दिल्लीत मोठी घडामोड झाल्याची पहायला मिळत आहे. एकीकडे राज्य सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याने सतत केंद्रातील भाजपा सरकारविरोधात वक्तव्यं करत जाहीर निषेध करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये भेट झाली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधान कार्यालयात जवळपास २० मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
इलोन मस्क ‘ट्विटर’चे नवे संचालक
टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी ‘ट्विटर’ने घेतला. अमेरिकेच्या रोखे व्यवहार आयोगाला (सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशन) तशी कागदपत्रे ‘ट्विटर’द्वारे सुपूर्द करण्यात आली आहेत. मस्क हे २०२४ पर्यंत ‘ट्विटर’चे वर्ग -२ संचालक असतील. कंपनीचा मालकी हक्क बदलू नये यासाठी केलेली ही उपाययोजना दिसते. नव्या नियुक्तीनुसार मस्क ट्विटरचे १४.९ भागांपेक्षा जास्त भाग भांडवल घेऊ शकणार नाहीत.
पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना
सुसज्ज घरे देणार : अजित पवार
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा बरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे,” असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (६ एप्रिल) येथे केले. यावेळी अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक आश्वासनही दिलं. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटनही अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
‘त्या’ उद्घाटन शिलेवरुन मुस्लिमांनी
खोडलं राज ठाकरेंचं नाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये हिंदुत्वाची भूमिका मांडली. राज यांच्या वक्तव्यावरुन मनसेमध्येच दुमत असल्याचं चित्र दिसत आहे. राज यांच्या या भूमिकेनंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही आपण वॉर्डमध्ये शांतता राखण्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतलीय. असं असतानाच आता पुण्यातील कोंढावा येथे राज यांनी उद्धाटन केलेल्या एका कब्रस्तानामधील शिलेवरील त्यांचं नाव काढून टाकण्यात आलंय.
द काश्मीर फाइल्स, चित्रपटाने
खरा इतिहास जगासमोर आणला
नितीय गडकरी यांनी नुकतीच इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्याता आलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक करत ते म्हणाले, “द काश्मीर फाइल्स” या चित्रपटाने काश्मीर खोऱ्यातील खरा इतिहास जगासमोर आणला आहे. त्यामुळेच हा चित्रपट लोक दीर्घकाळ लक्षात ठेवतील.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो
असलेले चॉकलेट भाजपने केले लॉन्च
गुजरात भाजपाने एक नवं चॉकलेट बाजारात आणलं आहे. या चॉकलेटच्या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला आहे. हे पौष्टिक न्यूट्रिशन बार सुरूवातीला गुजरात भाजपाचे प्रमुख सी आर पाटील यांनी संसदीय पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी भाजपाच्या मंत्री आणि खासदारांना वाटण्यात आली.
गांधींबद्दल जे बोललो त्याचा
पश्चाताप नाही : कालीचरण महाराज
महात्मा गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कालीचरण महाराजला जामीन मिळाला असून ते बाहेर आले आहे. यादरम्यान कालीचरण महाराजने महात्मा गांधींवर आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. एका पत्रकाराने विचारले की, तुम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो का? प्रत्युत्तरात कालीचरण महाराज म्हणाले, “नाही, मला माझ्या वक्तव्याचा काहीच पश्चाताप नाही. कलियुगात सत्य बोलल्याबद्दल मला शिक्षा झाली आहे.”
राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार; सर्व कॉलेजेस ऑफलाईन पद्धतीनं सुरु होणार
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही तिसरी लाट येऊन गेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला आहे असं चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये काही शाळा आणि कॉलेजेसही ऑफलाईन पद्धतीनं सुरु झाले आहेत. मात्र अजूनही राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस सुरु करण्यात आले नव्हते. मात्र आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.
लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे ‘त्यांचं’ गुणगान गातायत; प्रणिती शिंदेंची राज ठाकरेंवर टीका
मनसे ही भाजपला सी टीम मिळाली आहे. एकेकाळी भाजप विरोधात ‘लाव रे तो’ व्हिडिओ म्हणणारे त्यांचे गुणगान गात आहे. निवडणुकीदरम्यान हे सर्व मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे मागे टाकतात. महागाई सारखी मुद्दे सोडून असे मुद्दे धरायचे याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करत असल्याची टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी भाजपाचे कौतुक करत शिवसेना तसेच राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. यानंतर अनेक जणांना प्रतिक्रिया दिल्या. आता प्रणिती शिंदे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुनमगेट येथे महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकार विरोधात सडकून टीका करत केंद्र सरकारला लक्ष्य केले.
SD social media
98 50 60 35 90