मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. जवळपास पाच-सहा तास तुफान पाऊस बरसला. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळतीय.
वाशीनाका-चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, घरांवर संरक्षक भिंत कोसळून 10 जणांचा मृत्यू, 6 ते 8 जण अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ पोहोचण्यापूर्वी स्थानिक बीएमसी/अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 मृतदेह बाहेर काढले आहेत. 6 ते 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी आहे आणि शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.