के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील
विद्युत विभागाच्या (Electrical Department) अंतिम वर्षाच्या सार्थक पवार, गणेश पवार, सागर पाटील आणि दीपक महाले ह्या विद्यार्थ्यांनी सेल्फ चार्जिंग (रेंज एक्सटेंशन) सिस्टम’ च्या माध्यमातून ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ (Electrical Vehicles) तयार केली आहे.
विभागातील संपूर्ण प्राध्यापकांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर आणि विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. रवींद्र मुंजे यांच्या हस्ते हे वाहन सुरू केले. संस्थेच्या कार्यशाळेत ‘सेल्फ चार्जिंग (रेंज एक्सटेंशन) सिस्टम’ ची रचना आणि निर्मिती केली आणि इलेक्ट्रिक वाहनात यशस्वीपणे राबविली.
वाढत्या इंधन दरवाढीमुळे (Oil Price like) विजेवर चालणाऱ्या वाहनांना व त्यांच्या वापराला मिळणारा प्रतिसाद यामुळे भविष्यात या क्षेत्रात मुबलक संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहनाची एकंदर कार्यक्षमता सुधारण्याची आणि स्वतःचे स्टार्ट-अप (Start-up) सुरू करण्याची इच्छा आहे.
या प्रोजेक्ट साठी संस्थेचे वर्कशॉप (Workshop) व ई-मोर्टल ऑटोमोटिव्ह्ज टीम (E mortal Automotive Team) , विद्युत विभागाचे प्रा.अतुल शेवाळे, राहुल कार्लेकर, दीपक कुटे व विठ्ठल दाते यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त समीर वाघ, अशोकभाई मर्चंट, चांगदेवराव होळकर व सचिव प्रा के. एस. बंदी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.