अभिनेत्री स्मृती इराणी यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेला 21 वर्ष पूर्ण झाल्यामुळे एक व्हिडिओ शेअर केला आहे. शोमधील त्यांचं पात्र चांगलंच गाजलं. या शोमधील त्यांच्या भूमिकेमुळे त्याचं नाव घराघरांत पोहचलं. 2000 ते 2008 या काळात प्रसारित झालेल्या शोमध्ये त्यांनी तुलसी विरानीॆची भूमिका साकारली होती.
स्मृती इराणी यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ एक ची झलक आणि बिहाईंन्ड द सीनची झलक एकत्र केली आहे आणि हा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. छोट्या पडद्यावर परत येण्याच्या त्यांच्या ‘आश्वासनां’विषयी त्या बोलल्या, जे त्या पूर्ण करू शकल्या नाही आणि ज्यांनी ही मालिाक पाहिली त्या प्रेक्षकांनी किती प्रेम दिलं या बद्दल स्मृती इराणी बोलल्या आहेत.
हा व्हिडिओ शेअर करत स्मृती इराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ”आम्ही एक आश्वासन दिलं होतं ‘फिरे मिलेंगे, जे आम्ही पूर्ण करु शकलो नाही …’ 21 वर्षांपूर्वी अनेक लोकांचं आयुष्य बदलणारा असा प्रवास सुरु केला. काहीजण आनंदित झाले तर काहीजण नाराज झाले परंतु ज्यांनी हा शो पाहिला त्या सगळ्यांना या मालिकेने प्रभावित केलं.
मौनी रॉयसह सह-कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया
स्मृति इराणी यांच्या या पोस्टवर ‘क्यूकी सास भी कभी बहु थी’ मधील मौनी रॉयबरोबरच सह-कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. स्मृती इराणी यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. या मालिकेला आजही लोक भरभरुन प्रेम करतात आणि करत राहतील यात काहीच शंका नाही.