फिलीपिन्समध्ये विमानाला भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू

फिलीपिन्समध्ये विमानाला भीषण अपघात झाला असून आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 40 जणांना या दुर्घटनेतून वाचवण्यात यश मिळालं आहे. दक्षिण फिलीपिन्समध्ये रविवारी लष्करी विमानाचा अपघात झाला. AFPने दिलेल्या वृत्तानुसार विमानात एकूण 92 जण होते, त्यापैकी 29 जणांचा मृत्यू झाला आहे. संरक्षण सचिव डेल्फीन डेल्फिन लोरेन्झाना यांनी सांगितले की या अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला. तर 40 लोकांना वाचवण्यात यश आलं.

विमान अपघाताची माहिती मिळताच हवाई दलाने निवेदन जारी केलं. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे. विमान अपघातानंतर परिसरात आग आणि धुराचे लोळ उठले होते. हा अपघात नेमका कसा झाला याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

रॉयर्ट्सच्या म्हणण्यानुसार फिलीपीन एयर फोर्स C-130 एयरक्राफ्ट जोलो द्वीपवर उतरताना हा अपघात झाला. सोशल मीडियावर दुर्घटनेनंतरचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. आगीचे लोळ आणि धुरामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत मात्र बाकी लोकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.