नवी मुंबई वाशी वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी प्रमोद राजपूत आपली ड्युटी संपवून घरी जात होते. पामबीच मार्गालगत असणाऱ्या नेरुळ सिग्नलवर गाडी उभी राहिली होती. मागून आलेल्या भरधाव ह्युंदाई कंपनीची आय-20 कारने दोन वाहनांना विचित्र प्रकारे धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धडक दिलेल्या समोरील मारुती स्विफ्ट गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात गाडीचं जरी नुकसान झालेलं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन किरकोळ जखमी तर नवी मुंबई वाहतूक पोलिस कर्मचारी प्रमोद राजपूत सुखरुप आहेत.