अमेरिकेनं केलेल्या एका जबरदस्त स्फोटाची सध्या चर्चा आहे. अमेरिकेनं तब्बल अठरा हजार किलोचा बॉम्ब फोडला. चीन समुद्रातली सामरिक ताकद वाढवतंय. त्या ताकदीला आव्हान देण्यासाठी अमेरिकेने अटलांटिक महासागरात महाकाय स्फोट घडवून आणला. चीनच्या वाढत्या समुद्री सामर्थ्याचा सामना करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
अमेरिकन नौदलाने नव्या एअरक्राफ्ट पॅरिअरवर बॉम्बहल्ल्याची चाचणी केली. त्यासाठीच अमेरिकेनं हा तब्बल १८ हजार किलोंचा बॉम्ब समुद्रात फोडला. युद्धावेळी हल्ला झाला तर नवी जहाजं किती तग धरु शकतात, यासाठी ही चाचणी करण्यात आली. या स्फोटामुळे समुद्राच्या आत 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपासारखे हादरे जाणवले. युद्धप्रसंगी एखाद्या हल्ल्यात एअरक्राफ्ट कॅरिअर किती मारा झेलू शकतो यासाठी ही चाचणी करण्यात आली.
भर समुद्रातल्या या महाबॉम्बच्या महाकाय स्फोटामुळे चीनला धडकी भरलीय. अमेरिकन नौदलाने याला ‘फुल शिप शॉक ट्रायल’ असं म्हटलंय.. फ्लोरिडातल्या डायटोना किनाऱयापासून 100 मैल अंतरावर ही चाचणी झाली. स्वतःच्या जहाजांची क्षमता तपासणं आणि चीनला इशारा देणं, असा अमेरिकेनं दुहेरी हेतू या महाकाय बॉम्बमुळे साधलाय.