गॅलेक्सी एस सिरिजमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन

ज्या लोकांना नवीन फोन घेण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी बाजारात एक नवीन फोन आला आहे. Samsung Galaxy S20 FE हा गॅलेक्सी एस सिरिजमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनपैकी एक आहे. कंपनीने या फोनची किंमत आता कमी केली आहे. Galaxy S20 Series चे Fan Edition अर्थात Galaxy S20 FE ला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये 49 हजार 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते. आता त्याची किंमत खाली आली आहे. त्याची नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Qualcomm 865 प्रोसेसरसह येणारा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. त्याची किंमत कपात करण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षाच्या सुरूवातीला फेब्रुवारीमध्ये या फोनची किंमत 9 हजार रुपयांनी कमी करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत 40 हजार 999 रुपयांवर आणण्यात आली.

आता पुन्हा एकदा या फोनची किंमत खाली आली आहे. यावेळी कंपनीने फोनची किंमत 3 हजारने कमी केली आहे. यामुळे आता Galaxy S20 FE 37 हजार 999 रुपयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हा फोन Cloud Navy, Cloud White, Cloud Lavender, Cloud Mint आणि Cloud Red अशा एकूण पाच रंगात आला आहे.

या फोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर या सॅमसंग फोनला Octa-Core Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळते, जे microSD कार्डसह 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्लेसह 1080×2400 पिक्सल रिझोल्यूशनसह येतो. त्याचा रीफ्रेश दर 120Hz आहे.

यात ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सरसह ड्युअल सिम सपोर्ट आहे. हे Android 10 वर चालते. यात ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. यात 12MP प्रायमरी सेन्सर, 8MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा वाइड एंगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी यात 32 MPचा फ्रंट कॅमेरा आहे. हे 25W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh बॅटरीसह येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.