बहुतेक पुरुषांसाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे बाप होणे आहे. आपले बॉलिवूड स्टारसुद्धा या आनंदापासून स्वतःला दूर ठेवू इच्छित नाहीत. फिल्म इंडस्ट्रीतील काहींनी तर वयाच्या 40 ते 50 व्या वर्षीही बाप बनून हे सिद्ध केलंय की बाप होण्याला कोणतं वय नसतं. आज आम्ही अशाच हँडसम बापांबद्दल सांगणार आहोत जे चाळीशीनंतर वडील झाले आहेत.
सैफ अली खान : सैफ एक उत्तम अभिनेता असण्याबरोबर चार मुलांचा बाप आहे. लहान वयातच सैफने अमृता सिंगशी लग्न केले. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले अमृता आणि सैफ यांना आहेत. त्याचवेळी करीना कपूरशी लग्नानंतर तो दोन मुलांचा बाप झाला.
शाहरुख खान : शाहरुख खान सुहाना आणि आर्यन खान यांचा बाप आहे. किंग खान 47 व्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून अबरामचा पिता झाला. अब्रामचा जन्म आयव्हीएफ सरोगसीद्वारे झाला. आता तो 8 वर्षांचा आहे.
संजय दत्त : संजय दत्तने मान्यता दत्तशी लग्न केलं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी संजू बाबाला शहरान आणि इकरा अशी दोन मुले झाली.
मनोज वाजपेयी : मनोज अभिनयातून लाखो मनांवर राज्य करत आहे. नुकतीच त्याची ‘द फॅमिली मॅन 2’ वेब सीरिज रिलीज झाली असून या मालिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेता मनोज वाजपेयी 2011 मध्ये एका मुलीचा पिता झाला. त्यावेळी मनोजचे वय 42 वर्षे होते.