दक्षिण रेल्वेमध्ये 3,378 पदांसाठी भरती

रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या व्यक्तींकरिता सुवर्णसंधी आहे. जर आपल्याला रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर दक्षिण रेल्वेच्या रिक्त झालेल्या जागांवर लवकरात लवकर अर्ज करा. कारण भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. दक्षिण रेल्वे 3,378 पदे भरती करत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 आहे. या पदांवर भरतीसाठी दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी sr.indianrailways.gov.in वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

पदांचा तपशील


कॅरेज वर्क्स, पेरंबूर – 936 जागा
गोल्डनरोक वर्कशॉप – 756 जागा
सिग्नल अँड टेलिकॉम वर्कशॉप, पोदानूर – 1686 जागा
रिक्त पदांची एकूण संख्या-3378 जागा

फिटर, पेंटर आणि वेल्डर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह दहावी (मॅट्रिक) उत्तीर्ण केलेली असावी. मेडिकल लॅब टेक्निशियन (रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, कार्डियोलॉजी) पदांसाठी अर्ज करण्यासाठी पदवी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात किमान 50० टक्के गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावी. तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अभ्यासक्रम पास केलेला असावा.

फ्रेशर उमेदवार, आयटीआय, एमएलटी या उमेदवारांचं वय अनुक्रमे 22 आणि 24 वर्षांपेक्षा अधिक नसावं.

EX ITI प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड दहावी व आयटीआय मध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. त्याचबरोबर एमएलटी पदासाठी बारावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.

इच्छुक आणि पात्र उमेदवार sr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.