आज दि.१० जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र ?

आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं असून पुढील पाच वर्ष हे सरकार टीकेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणला पटलं नसतं. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे,” असं कौतुक शरद पवारांनी यावेळी केलं. सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती अशी आठवण करुन देताना हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष टीकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तुम्ही जर ऐकलं नाहीत, तर तुमच्यावर
वाईट परिस्थिती ओढवेल : कपिल सिब्बल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षाला सूचक इशारा दिला आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजपामध्ये प्रवेश करण्यावर टीका करतानाच त्यांनी पक्षनेतृत्वालाही सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. “दुसऱ्यांचं ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही. कॉर्पोरेट व्यवस्था देखील जगू शकत नाही. राजकीय पक्षांचं देखील तसंच आहे. तुम्ही जर ऐकलं नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल”, असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसवर आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये खेळाडू
अरुणा तन्वर सहभागी होणार

यंदाच्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताकडून तायक्वांदो खेळाडू अरुणा तन्वर सहभागी होणार आहे. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून अरुणा या स्पर्धेत प्रवेश करणार आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय तायक्वांदो खेळाडू आहे. अरुणाला तिच्या उत्तम कामगिरीमुळे वाईल्ड कार्ड प्रवेश मिळाला, असे भारतीय ताइक्वांडोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी सांगितले.

करोना लस घेतल्यानंतर अंगाला
लोखंड, स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्या

करोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू तसंच नाणी चिकटत असल्याची अजब घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली असून त्यावरुन आश्चर्य व्यक्त होत आहे. ७२ वर्षीय अरविंद सोनार यांनी आपण करोना लस घेतल्यापासून अंगाला या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. दरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी लसीचा आणि वस्तू चिकटण्याचा काही संबंध नसल्याचं सांगत दावा फेटाळला आहे.

लर्निंग लायसन्ससाठी घेतली जाणारी
परीक्षा घरूनच देण्याची परवानगी

करोनामुळे कार्यालये बंद असल्याने आणि निर्बंध असल्यामुळे प्रवास करण्यावर मर्यादा येत असल्याने अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या या समस्येवर पर्याय शोध महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसे आदेश राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत. लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी नागरिकांना आता ‘आरटीओ’मध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

चीनी प्रशासनाच्या नमुन्यांना नष्ट करून
कागदपत्रे लपविण्याचा प्रयत्न

चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा अमेरिका, ब्रिटेन आणि इतर देशांचे संशोधक करत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीन आता यावर सारवासारव करत आहे. चीनी प्रशासन या संदर्भातील नमुन्यांना नष्ट करून कागदपत्रे लपविण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार मंडळाचे सदस्य जेमी मेटजल यांनी फॉक्स न्यूजला दिली. चीन सरकार आपल्या संशोधकांना खोटे आदेश देत असून, मूलभूत प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आणि पत्रकारांना कारागृहात टाकत आहे.

मुंबईत इमारत कोसळल्याने
११ जणांचा मृत्यू

मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली असून यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती आहे.

राहुल गांधी यांची युवा
नेत्यांच्या फळी विस्कळित

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या आधी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जितिन प्रसाद यांच्या पक्ष सोडण्यामुळे राहुल गांधी यांची युवा नेत्यांच्या फळी विस्कळित झाल्याचे चित्र आहे. आगामी काळात अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या
अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना त्यांच्या देशातील तरुणाने भररस्त्यात एकच श्रीमुखात लगावली. कोरोना संकटात सर्वस्व गमावल्याचा आणि फ्रान्समध्ये लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचा राग त्याच्या मनात उफाळून आला आणि त्याने हे कृत्य केले. या कृत्याचा निषेधच व्हायला हवा, पण जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी. मॅक्रॉन यांच्याबाबत जे घडले त्याचा हाच संदेश आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते
फेसबुकने केले निलंबित

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते फेसबुकने दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. कारण त्यांच्यावर लोकांमध्ये हिंसाचार पसरवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. तपासा दरम्यान असे आढळले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 जानेवारी रोजी कॅपिटल इमारतीवरील हल्ल्याआधी हिंसाचाराला प्रोत्साहन दिले होते. फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी शुक्रवारी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या घटनेनंतर सार्वजनिक सुरक्षेचे धोके कमी झाले आहेत की, नाही हे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल.

भाजपा नेत्याच्या
मुलीची निर्घृण हत्या

झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एका १६ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. झाडाला लटकलेल्या अवस्थेत असणारा मृतदेह सापल्यानंतर एकच खळबल उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या करण्याआधी आणि झाडाला लटकवण्याआधी तिचे डोळे बाहेर काढण्यात आले होते. पीडित मुलगी ही स्थानिक भाजपा नेत्याची मुलगी होती. ती दहावीच्या वर्गात होती.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.