विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? याची प्रतीक्षा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना होती, त्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.
राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? याची प्रतीक्षा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना होती, त्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.
ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेता आल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते.