भारतामधीलच नाही तर जगातील टॉप ऑनलाईन सेलर असलेल्या कंपन्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी आता भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओकडून व्हॉट्सअॅप सोबत करार करण्यात आला आहे. या करारानुसार तुम्ही एखादी ऑनलाईन वस्तू खरेदी केली, तर ती अवघ्या कही तासांमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. म्हणजेच तुम्ही जर एखादी वस्तू इतर ऑनलाईन साईटवरू बूक केली तर ती घरी येण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागतो, मात्र रिलायन्स स्टोअरवरू बूक केल्यास अवघ्या काही तासांमध्ये तुम्हाला ती मिळू शकते.
याबाबत बोलताना रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचे संचालक आकाश अंबानी यांनी म्हटले आहे की, आजच्या डिजिटल युगामध्येही किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहेत. ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात या व्यापाऱ्यांनी देखील बदलले पाहिजे. त्यांनी देखील डिजिटल व्हावे असे आम्हाला वाटते, त्यामुळे या व्यापाऱ्यांना अशीच एक संधी रिलायन्स जिओकडून येणाऱ्या काळात उलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांचा देखील मोठ्याप्रमाणात फायदा होऊ शकतो. रिलायन्स जिओने व्हॉट्सअॅप सोबत करार केला आहे. लवकरच भारतामध्ये कुठल्याही सामानाची डिलिव्हरी अवघ्या काही तासांमध्ये पोहोचने शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळानंतर व्यापाराच्या सर्वच व्याख्या बदलून गेल्या आहेत. डिजिटलायझेशनला महत्त्व आहे. आता प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन होऊ पहाते आहे. इंटरनेट क्षेत्रात या आधीच जीओमुळे क्रांती घडून आली आहे. मात्र आता याच नेटवर्कचा उपयोग करून देशातील छोटे-मोठे व्यापारी जोडण्याचा आमचा उद्देश आहे. डिजिटलायझेशनमुळे त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच जिओचे देशभरात मोठ-मोठे मार्केत आहेत. त्याच्यामाध्यमातून देखील ग्राहकांना वस्तू पुरावल्या जाऊ शकतात असे आकाश यांनी म्हटले आहे.