भारतीय सैन्य जगाला धडकी भरवणारे सैन्य म्हणून ओळखले जाते. आता भारतीय सैन्याचं बळ आणखी वाढलं आहे. कारण भारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी अंदमान निकोबारमध्ये करण्यात आली. संरक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने अचूकपणे लक्ष्य गाठले. एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधा यांनी जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी ते अंदमान आणि निकोबार बेटावर आहेत. असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनेही दिले आहे. गेल्या अनेक दिवसात भारताने अशा अनेक चाचण्या केल्या आहेत. ज्यामुळे भारतीय सैन्याची ताकद ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा फायदा आगामी काळात संघर्ष वाढल्यास दुष्मनाला धूळ चारण्यासाठी होणार आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला 13 मार्च रोजी भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. खरं तर भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची नवीन हवेतून मिसाईल विकसित करण्याच्या तयारीत आहे, जे शत्रूच्या बेसवर अधिक वेगाने हल्ला करण्यास सक्षम असेल. हे क्षेपणास्त्र 800 किमी अंतरापर्यंत हल्ला करू शकते. यापूर्वी Su-30MKI लढाऊ विमानांची लक्ष्ये गाठण्यासाठी सुमारे 300 किमीची रेंज होती, ती वाढवून 350-400 करण्यात आली. आता त्याच्या 800 किमी वेरिएंटवर काम सुरू आहे.
इंडो-रशियन संयुक्त उपक्रमाद्वारे ‘ब्रह्मोस एरोस्पेस’ सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे तयार केले जाते जी पाणबुडी, जहाजे, विमाने किंवा जमिनीवर आधारित प्लॅटफॉर्मवरून सोडली जाऊ शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे मॅक 2.8 किंवा ध्वनीच्या जवळपास तिप्पट वेगाने प्रक्षेपित होऊ शकतात. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची अचूकता ते अधिक मारक बनवते. त्याची रेंजही वाढवता येते. याशिवाय हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारपासून दूर जाण्यातही अतिशय वेगवान आहे. ब्रह्मोसमध्ये ब्रह म्हणजे ‘ब्रह्मपुत्रा’ आणि मोस म्हणजे ‘मॉस्कवा’. मॉस्क्वा हे रशियात वाहणाऱ्या नदीचे नाव आहे. ब्राह्मोस 21 व्या शतकातील सर्वात पॉवरफुल्ल मिसाईलपैकी पॉवरफुल्ल मानले जाते, जे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र ताशी 4300 किमी वेगाने शत्रूचे आड्डे नष्ट करू शकते.