ग्लोबल वॉर्मिंगमुळं 20 वर्षात तब्बल 750 चौरस किलोमीटर बर्फ वितळला

औद्योगिकरणातून मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि त्यातून नफा यात अडकलेल्या माणसाला मात्र याकडे लक्ष द्यायलाच वेळ नसल्याचं पाहायला मिळतंय.
अशातच जागतिक हवामान बदलाने पृथ्वीचं तापमान वाढून अनेक परिणाम होत असल्याचं आता समोर येत आहेत.

मागील 20 वर्षात आइसलँडवरील (Iceland) बर्फाचा (Glaciers) जवळपास 750 चौरस किलोमीटर भाग वितळला आहे.
हे क्षेत्र आईसलँडच्या बर्फाच्छादित एकूण क्षेत्राच्या 7 टक्के आहे. सोमवारी (31 मे 2021) याबाबत एक आंतरराष्ट्रीय अभ्यास अहवालच प्रकाशित झालाय.
आईसलँडची वैज्ञानिक पत्रिका जोकुलच्या अभ्यास अहवालात हवामान बदलामुळे आतापर्यंत वितळलेल्या बर्फाची सविस्त माहिती देण्यात आलीय. यानुसार, आईसलँडमध्ये समावेश असलेल्या देशाच्या 10 टक्के जमीनीवर बर्फ बसरलेला आहे.
2019 मध्ये 10,400 चौरस किलोमीटर भागातील बर्फ वितळला होता. 1890 नंतर बर्फाने आच्छादलेल्या 2200 चौरस किलोमीटर जमिनीवरील बर्फ वितळला आहे. हे प्रमाण एकूण बर्फाच्या 18 टक्के इतकं आहे.
बर्फाळ प्रदेशाचा अभ्यास करणाऱ्या जाणकार, संशोधकांनी नुकतीच एक आकडेवारी जारी केलीय. यानुसार, बर्फ वितळ्याच्या घटनांमध्ये 2000 नंतरच मोठी वाढ झालीय. हा वेग असाच राहिला तर 2200 पर्यंत आईसलँडवरील संपूर्ण बर्फ वितळून जाईल. 1890 नंतर आईसलँडवरील भागात औद्योगिकरणातून निघणारे वेगवेगळे वायु हवामान बदलाला कारणीभूत ठरत आहेत. दुसरीकडे या भागात होणाऱ्या ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक संकटांचाही परिणाम होतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.