केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जानेवारी 2022 मध्ये परीक्षेचे आयोजन

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेचं आयोजन जानेवारी 2022 मध्ये केलं जाणार आहे. यूपीएससीकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा 7 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित केली जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात लवकरच नोटिफिकेशन वेबसाईटवर जारी केलं जाणार आहे.

यूपीएससीनं जारी केलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या सविस्तर माहितीपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जे विद्यार्थी किंवा उमेदवार नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे. मुख्य परीक्षेसाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाला यूपीएससीकडून डीटेल्ड अ‌ॅप्लिकेशन फॉर्म-1 असं म्हटलं जाते. डीएफमध्ये विद्यार्थ्यांना जन्म तारीख, जात प्रमाणपत्र, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीज अपलोड कराव्या लागतात. मुख्य परीक्षेसाठी निर्धारित करण्यात आलेलं शुल्क देखील विद्यार्थ्यांना भरावं लागेल.

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान विविध टप्प्यावर उमेदवारांकडून अर्ज दाखल करुन घेते. पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. तर, मुख्य परीक्षेसाठी डीटेल्ड अ‌ॅप्लिकेशन फॉर्म सादर करावा लागतो. तर, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी डीएफ-2 अर्ज सादर करावा लागतो. यासाठी उमेदवारांकडून शुल्क आकारण्यात येत नाही. मुलाखतीच्या अर्जात उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम विचारले जातात. यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवांचे पर्याय उपलब्ध असतात.

यूपीएससीकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्य परीक्षेसाठी डीएएफ लवरकरच जाहीर केला जाणार आहे. नोव्हेंबर 2021 च्या अखेरच्या आठवड्यात डीएफ लिंक अॅक्टिव्ह केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, यूपीएससीकडून यासंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

How to prepare UPSC exam :

https://upscgoal.com/how-to-start-preparing-for-upsc/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.