दहावीचे परीक्षेचे अर्ज दाखल करुन घेण्यास सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करुन घेण्याचं काम सुरु आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानं परीक्षा देखील ऑफलाईन मोडद्वारे होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 18 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दहावीसाठी परीक्षा अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वीच्या परीक्षांसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र 18 नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर स्वीकारण्यास सुरुवात झालीय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी माध्यमिक शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल करुन घेण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यानच्या कालावधीमध्ये परीक्षांच्या तारखांची घोषणा केली जाईल, असं भोसले म्हणाले होते. 18 नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून नियमित शुल्कासह अर्ज भरायला सुरुवात होणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.

2022 ची परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची या संदर्भात म्हणणं माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं राज्य सरकारला कळवलं असल्याची माहिती अशोक भोसले यांनी दिली. राज्य सरकारकडून या संदर्भातही निर्णय घेतला जाईल, असं अशोक भोसले यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.