UPSC ने 2023 मधील परीक्षांचे वेळापत्रक केले जारी

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2023 मधील परीक्षांचे वेळापत्रक जारी केले असून यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नागरी सेवा प्राथमिक परीक्षा ही 28 मे 2023 रोजी होणार आहे. त्याची अधिसूचना 01 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार असून परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे. तर, नागरी सेवा मुख्य परीक्षा 15 सप्टेंबर 2023 ते 20 सप्टेंबर 2023 या पाच दिवसात होईल.

( IFS ) आयएफएस परीक्षा 28 मे 2023 रोजी घेण्यात येणार असून परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे.

भारत अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा 19 फेब्रुवारी 2023 रोजी तर भारतीय वन सेवेची मुख्य परीक्षा 26 नोव्हेंबरला होणार आहे.

संयुक्त भू-शास्त्रज्ञ मुख्य परीक्षा 24 जून 2022 रोजी होईल.

एनडीए एनए – I परीक्षा आणि सीडीएस – I ची अधिसूचना 21 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षा 16 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणार आहेत.

एनडीए-II आणि सीडीएस-II ची अधिसूचना 17 मे 2023 रोजी प्रसिद्ध होतील तर परीक्षा 6 जून रोजी होईल.

CAPF सहाय्यक कमांडंट भरती परीक्षा अधिसूचना 26 एप्रिल 2023 रोजी जारी होणार आहे. 16 मे 2023 पर्यंत या परीक्षेसाठी उमेदवार अर्ज करू शकतील. तर यासाठीची परीक्षा 6 ऑगस्टला होईल.

या परीक्षांसंदर्भातील सर्विस्तर माहिती UPSC च्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या वेबसाइटवरून इच्छुक उमेदवार अधिक माहिती घेऊ शकतील.

असे करा वेळापत्रक डाउनलोड
यूपीएससीच्या upsc.gov.in या वेबसाइटच्या होमपेजवर ‘Examination’ पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून ‘Calendar’ पर्यायावर जावे.

नवीन वेबपेज उघडेल त्यातील ‘Annual Calendar 2023′ या लिंकवर क्लिक केल्यास PDF स्वरूपात संपूर्ण वेळापत्रक दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.