शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेत संजय राऊतांनी त्यांना शिवसेना स्टाईलनं तुफान फटकेबाजी केली. यावेळी कोल्हापूरच्या महाविकास आघाडीच्या विजयावर बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. अब चंपाकली मुरझायी हैं,कोल्हापुरातही पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही, असा टोला संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुण्यातील हडपसर येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत असलेली कामे, हिंदुत्व, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची मैत्री, राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात उठवलेला आवाज, तसंच नुकताच कोल्हापूर उत्तरचा लागलेला निकाल, अशा चौफेर विषयांवर राऊतांनी भाष्य केलं आहे.