चक्रीवादळाचा तडाखा
ओडिशामध्ये बसला
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणाऱ्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये तब्बल १२० ते १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनिशी हे चक्रीवादळ धडकलं. एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, भारतीय नौदल अशा सर्व यंत्रणा बचावकार्य करण्यामध्ये आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर लँडफॉल झाल्यानंतर यास चक्रीवादळानं झारखंडच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला आहे. प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
झारखंड राज्याने ३७.३ टक्के
लशी वाया घालवल्या
करोनाचं संकट दूर करण्यासाठी लसीकरण हे सर्वात प्रभावी हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात करोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र देखील बंद आहेत. सरकारने लस वाया घालवत असलेल्या राज्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत झारखंड आणि छत्तीसगड ही दोन राज्य आघाडीवर आहेत. झारखंड राज्याने पुरवठा करण्यात आलेल्या एकूण लशींच्या ३७.३ टक्के लशी वाया घालवल्या आहेत. छत्तीसगडमध्ये एकूण लशींच्या ३०.२ टक्के लशी वाया गेल्या आहेत.
११ हजार ७१७ जणांना
ब्लॅक फंगसची लागण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात २५ मे २०२१ रोजी रात्री ९.३० वाजेपर्यंतची आकेडवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ११ हजार ७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रात असल्याचं दिसून आलं आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे.
५० टक्के नागरिकांचे लसीकरण
झाले तरच लॉकडाऊन उठू शकेल
सध्या राज्यात सुमारे एक ते दीड महिन्यापासून कडक लॉकडाऊन सुरू असल्याने दैनंदिन व्यवहार तसेच उद्योगधंदे, छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. सहाजिकच आर्थिक चक्र थांबल्यामुळे आता तरी लॉकडाऊन उठवावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. परंतु लॉकडाऊन कधी उठणार यासंबंधी राज्य शासनाकडून वेगवेगळ्या सूचना येत आहेत. राज्यातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले तरच लॉकडाऊन उठू शकेल, असे मत कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे.
फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल
मीडियावर निर्बंध घालण्याची चर्चा
माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत केंद्र सरकारच्या नव्या दिशानिर्देशांचे पालन न केल्यास भारतात फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर निर्बंध घालण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या नियमांना लागू करण्यावर काम सुरू असल्याचे उत्तर कंपनीकडून देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून नव्या नियमांना २५ फेब्रुवारीला अधिसूचित करण्यात आले होते. सोशल मीडियावर ते लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. ही कालमर्यादा २५ मेपर्यंत समाप्त झाली. या कालमर्यादेला मुदतवाढ देण्यात आली नाही. दिशानिर्देशानुसार जर कंपन्या नियमांचे पालन करण्यास असमर्थ ठरल्या, तर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
जगाला कोरोना साथीच्या मूळ
स्थानाचा शोध घेण्याची गरज
कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर दबाव वाढवला आहे. कोरोना विषाणू विषयी व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार म्हणाले की, जगाला कोरोना साथीच्या मूळ स्थानाचा शोध घेण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात निश्चित स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असून हा शोध चीन देशापर्यंत जाऊ शकतो. व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार अँडी स्लाविट यांनी सांगितले की, या साथीच्या मुळाशी जावे लागेल आणि त्यासाठी चीनला पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया स्वीकारावी लागेल.
दूध डेअरीच्या अधिकाऱ्याकडे
आढळली साडेतीन कोटीची रोकड
गोरेगाव दूध डेअरीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नथू विठ्ठल राठोड याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. एसीबीने त्याला अटक केली आहे. त्याच्या घराची झाडाझडती घेतल्यावर ३ कोटी ४६ लाख रुपयांची रोकड आढळली आहे. राठोड याच्या नातेवाईकांच्या मालमत्तेबाबतही एसीबी तपास करत आहे. नथू राठोड याच्याकडे गोरेगाव दुग्ध वसाहत तसेच प्रशासन उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदाराने घर दुरुस्तीसाठी अर्ज करण्यासाठी राठोड याची भेट घेतली. राठोड याने तक्रारदाराला शिपाई अरविंद तिवारी याला भेटण्यास सांगितले.
PSI पदासाठी शारीरिक चाचणीत
60 गुण मिळवणं आवश्यक
MPSC ने PSI भरतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार PSI पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरंच विद्यार्थ्यांना मुलाखत देता येणार आहे. आता मैदानी गुण फक्त क्वालिफिकेशनसाठी गृहीत धरले जाणार आहेत, तशी माहिती MPSC ने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आलीय.
बारावीच्या परीक्षा घेतल्या जाव्यात,
बिहार सरकारची भूमिका
बारावीच्या परीक्षा घेतल्या जाव्यात ही बिहार सरकारची भूमिका आहे. बिहारचे शिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांचं आयोजन केलं जावं, असं म्हटलं. बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणात आणि आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. सध्याच्या परिस्थितीत बारावीच्या परीक्षां घेण्यासारखी परिस्थिती नसली तरी संभाव्य तारीख जाहीर केली जावी. बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन परीक्षा हा देखील पर्याय आहे, असं देखील चौधरी म्हणाले.
मुंबई अनलॉक करणे
घातक ठरू शकते..
येत्या 1 जूनपासून लॉकडाऊन उठवला जाणार का, याकडे संपूर्ण राज्यातील नागरिक डोळे लावून बसले असताना आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊन आणखी काही काळ लांबण्याचे संकेत मिळत आहेत. अस्लम शेख बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केले. मुंबईतील 50 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन उठवणे हे म्हणजे कोरोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखे आहे.
सीबीआयच्या प्रमुखपदी
सुबोध कुमार यांची निवड
माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार यांची सीबीआयच्या प्रमुखपदी निवड झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या बैठकीनंतर जयस्वाल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर सीबीआय संचालकपदी त्यांचीच नियुक्ती झालीय. 1985 च्या बॅचमधील जयस्वाल यांची 2 वर्षांसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती झालीय. पदभार स्वीकारल्यापासून ही 2 वर्षांची मुदत असेल.
SD social media
9850 60 3590