ओमायक्रॉनमुळे 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर निर्बंध येण्याची शक्यता अधिक आहे. सेलिब्रेशनला परवानगी देताना विचार करावा लागेल, असे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. सेलिब्रेशनला परवानगी देताना विचार करावा लागेल, असे त्या म्हणाल्या.
ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेचं संकट आहेत. अशातच पार्ट्या आणि कॉन्सर्टच्या निमित्ताने गर्दी होत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना परवानगी देतांना खूप विचार करावा लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकांनी नियम पाळले नाहीत तर याचा परिणाम थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर होऊ शकतो, असे संकेत यावेळी त्यांनी दिलेत.
करोना च्या संदर्भातील सर्व नियम पाळण्याचे तसेच जास्त गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे. संबंधित व्यक्तीने दोन डोस घेतली आवश्यक आहे. दोन अडवन्स घेतलेले नसतील अशा व्यक्तींना जास्त गर्दीच्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे.