National Pension Scheme अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजनेतील गुंतवणुकीद्वारे तुम्ही करोडपती बनू शकता. म्युच्युअल फंड, शेअर बाजार यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ नसणाऱ्यांसाठी National Pension Scheme चांगला पर्याय आहे. खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही भविष्यात चांगला लाभ मिळावा या हेतूने हे आवाहन केलं जात आहे. NPS मधून चांगला परतावाही मिळतो असं तज्ज्ञ सांगतात.
NPS ही योजना एखाद्या म्युच्युअल फंडाप्रमाणे काम करते. NPS योजनेत इक्विटी, कॉर्पोरेट बाँड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अशा तीन प्रकारांमध्ये गुंतवणूक होते. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील कर्मचारी NPS योजनेत गुंतवणूक करु शकतात. तुम्ही प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम या योजनेत गुंतवू शकता. निवृत्तीनंतर तुम्ही जमा झालेल्या पैशांपैकी काही हिस्सा काढून घेऊ शकता. त्यानंतर नियमित उत्पन्नासाठी उर्वरित रक्कमेचा वापर करु शकता.
तुम्हाला NPS योजनेतील गुंतवणुकीद्वारे करोडपती होणं सोप आहे. समजा तुमचं सध्याचं वय 25 आहे. तुम्ही दर महिन्याला NPS मध्ये 5400 म्हणजेच दिवसाला 180 रुपये गुंतवणूक करु शकता. निवृत्तीचं वय 60 आहे. त्यामुळे तुमच्याकडे 35 वर्ष आहेत. या गुंतवणुकीवर तुम्हाला 10 टक्के दरानं परतावा मिळेल. ज्यावेळी तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमच्या पेन्शनची एकूण रक्कम 2.02 कोटी असेल.
NPS मध्ये गुंतवणुकीची सुरुवात
वय : 25
दरमहा गुंतवणूक: 5400 रुपये
गुंतवणुकीचा काळ: 35 वर्षे
परतावा व्याजदर: 10 टक्के
NPS च्या गुंतवणुकीचं गणित
एकूण गुंतवणूक: 22.68 लाख
एकूण व्याज: 1.79 कोटी
पेन्शन किंमत : 2.02 कोटी
कर बचत : 6.80 लाख
पेन्शन किमती मिळणार?
तुम्ही NPS मधील रक्कम एक वेळी काढू शकत नाही. तुम्हाला एकूण रकमेच्या 60 टक्के रक्कम काढता येते. इतर 40 टक्के रक्कम वार्षिक योजनेत टाकावे लागतात. त्यानुसार तुम्ही एकावेळी 1.21 कोटी रुपये काढू शकता. त्यानंतर व्याज 6 टक्के असेल तर तुम्हाला 40 हजार रुपये पेन्शन मिळेल.
पेन्शन कशी मिळणार?
वार्षिक योजना : 40 टक्के रक्कम, व्याज :6 टक्के, एकावेळी काढलेली रक्कम 1.21 कोटी, दरमहा पेन्शन : 40 477 रुपये
तुम्ही देखील जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल त्याचा फायदा तुम्हाला निवृत्त होताना मिळेल. त्यावेळी तुम्ही करोडपती असाल.