राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसीकरणाची मोहिम संथगतीने सुरु आहे. अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 33 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्यात जवळपास 2 कोटी 06 लाख 24 हजार 930 नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. काल दिवसभरात तब्बल 1 लाख 20 हजार 743 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
महाराष्ट्राच्या 12 करोड 8 लाख या एकूण लोकसंख्येपैकी 2 कोटी 06 लाख 24 हजार 930 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात 1 कोटी 55 लाख जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 43 लाख 7 हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यात 18 ते 45 वयोगटातील 6 लाख 83 हजार जणांचा समावेश आहे. तर 45 वयोगटातील 29 लाख 1 हजार लोकांना लस देण्य़ात आली आहे.
राज्यात 18 ते 45 या वयोगटाची एकूण लोकसंख्या 5 कोटी 71 लाख इतकी आहे. त्यापैकी 6 लाख 83 हजार जणांना लस देण्यात आली. तर 45 पुढील वयोगटाची एकूण लोकसंख्या 1 करोड 27 लाख इतकी आहे. त्यापैकी 29 लाख 1 हजार लोकांना लस देण्य़ात आली म्हणजे आतापर्यंत 9.7 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे.
तर आरोग्य कर्मचारी हे एकूण लोकसंख्या 15 करोड 7 लाख इतकी असून त्यापैकी 11 लाख 56 हजारंनी पहिला डोस देण्यात आला आहे. तर 7 लाख 17 हजार कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची एकूण लोकसंख्या 19 लाख 82 हजार आहे. त्यापैकी 16 लाख 37 हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 7 लाख 44 हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे.