आपण घरात हवा तेवढा एसीचा वापर करु शकाल आणि गगनाला भिडणारे वीज बिलदेखील येणार नाही. कारण आता सौर एसी बाजारात दाखल झाला आहे. म्हणजेच हा एसी वापरण्यासाठी विजेची आवश्यकता नाही. हा एसी सौर प्लेटला (Solar Plate) जोडलेला आहे. परंतु एक अडचण आहे, ती म्हणजे हे एसी इलेक्ट्रिक एसीपेक्षा महाग आहेत, परंतु दीर्घकालीन पैसे वाचविण्यात ते आपली मदत करतात.
बाजारात 1 टन, 1.5 टन आणि 2 टन क्षमतेचे सोलार AC उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एसी खरेदी करू शकता. वीज बचतीच्या बाबतीत सोलार एसी स्प्लिट किंवा विंडो एसीच्या तुलनेत 90 टक्के वीजेची बचत करू शकतो. जर आपण सामान्य एसी वापरत असाल तर, तो दिवसाला 20 युनिट्स (15-16 तास एसी चालवल्यास) वीजेचा वापर करतो. याचाच अर्थ महिन्याला 600 युनिट्स वीज वापरतो. म्हणजेच केवळ एसीचं एक महिन्याचं वीजबिल हे 4,000 ते 4,200 रुपये इतकं होईल.
सौर एसीबद्दल बोलायचे झाल्यास हा एसी तुमची गरमी आणि अधिक वीजबिल दोन्हींपासून सुटका करतो. जर तुम्ही थोडी काळजी घेऊन सौर एसी वापरत असाल तर कदाचित तुम्हाला त्यासाठी 1 रूपयादेखील खर्च करावा लागणार नाही. म्हणजेच एकदा गुंतवणूक करा आणि वीज बिलाच्या टेन्शनपासून कायमचे मुक्त व्हा, अशी ही योजना आहे.
आजच्या काळात बर्याच कंपन्या सौर एसी बनवतात. वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने जवळपास समान किंमतीची असतात. पार्ट्सविषयी बोलायचे झाल्यास, सौर एसीमध्ये सामान्य एसी सारखेच फीचर्स असतात. परंतु सौर प्लेट आणि बॅटरी स्वतंत्रपणे जोडली गेलेली असते. या एसीच्या किंमतीविषयी बोलायचे झाल्यास, 1 टन एसी (1500 वॅट सौर प्लेट) साठी 97 हजार रुपये, 1.5 टन एसीसाठी 1.39 लाख रुपये आणि 2 टन एसीसाठी 1.79 लाख रुपये खर्च करावे लागतील. हा खर्च आत्ता आपल्याला खूपच जास्त वाटू शकतो, परंतु या एसीमुळे दीर्घकाळापर्यंत तुम्हाला वीज बिलापासून आराम मिळू शकेल.
इथे तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेतली पाहिजे की, AC जितका जास्त क्षमतेचा (अधिक टन) असेल तितकी जास्त वीज त्यासाठी लागते. परिणामी अधिक सोलार प्लेट्सची आवश्यकता भासते. त्यामुळे अशा एसींची किंमतही वाढते.
सौर प्लेट इनव्हर्टर आणि बॅटरीशी जोडलेली आहे. सौर प्लेट सूर्यप्रकाशापासून उर्जा निर्माण करते, जी बॅटरी चार्ज करते. एसी या बॅटरीच्या उर्जावर चालतो. दुसऱ्या बाजूला जर एखाद्या दिवशी ढगांमुळे अथवा इतर कोणत्याही कारणांमुळे सौर प्लेटवर सूर्यकिरणे पडू शकली नाहीत तर घरातील वीजेच्या कनेक्शनसह तो एसी चालेल.