दीपिका वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत बॅडमिंटन खेळली आहे. तिनं तिच्या शाळेसाठी काही राष्ट्रीय स्पर्धांमध्येही भागही घेतला आहे. मात्र त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली.
भारतातील महान बॅडमिंटनपटूंची यादी तयार केली गेली तर प्रकाश पदुकोणशिवाय यांच्या शिवाय ती यादी अपूर्ण ठरेल. मात्र त्यांची मुलगी दीपिका पदुकोणनं मात्र वडिलांच्या पाऊलावर जाऊ नये असा त्यांचा निर्णय होता आणि मग त्यांनी अभिनवयाची निवड केली. मात्र सुरुवातीला दीपिका बॅडमिंटनही खेळायची. काही काळानंतर तिनं हा खेळ सोडला.
दीपिका वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत बॅडमिंटन खेळली आहे. तिनं तिच्या शाळेसाठी काही राष्ट्रीय स्पर्धांमध्येही भागही घेतला आहे. लहानपणापासूनच ती याचा सराव करत होती.
एका मुलाखतीत आपल्या बॅडमिंटन कारकीर्दीबद्दल बोलताना ती म्हणाली की, प्राक्टिसमुळे टीव्ही आणि चित्रपट पाहण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. 20 सप्टेंबर 2020 रोजी हिंदुस्तान टाइम्स या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली की, ‘माझी दिनचर्या खूप वेगळी होती. मी सरावासाठी सकाळी चार वाजता उठायची. घरी येऊननंतर शाळेत जायचे. शाळा संपल्यानंतर घरी परत यायचे,’ बॅडमिंटन कोर्टमध्ये जा. तेथून परत या आणि झोपा.’
मात्र नंतर दीपिकाच्या वडिलांनी निर्णय घेतला की तिनं बॅडमिंटन खेळागयचं नाही. त्याच मुलाखतीत दीपिका म्हणाली, ‘वयाच्या 16 व्या वर्षी मी सिंगल कोपनहेगन (डेन्मार्क) ला गेली होती. मी तिथून परत आली तेव्हा मी ठरवलं की मी बॅडमिंटन खेळणार नाही. बॅडमिंटन हे माझे दुसरे प्रेम होतं. पहिलं नाही.
बॅडमिंटनमध्ये दीपिका तिचे पाय सेट करत होती तेव्हाच तिनं खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी ती मुंबईत स्थायिक झाली.
दीपिकाला या क्षेत्रात यश मिळालं. 2007 बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत तिनं ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. यापूर्वीही तिनं काही जाहिराती केल्या होत्या. तिचा पहिला चित्रपट हा सुपरहिट ठरला आणि त्यानंतर तिने मागं वळून पाहिलं नाही.
दीपिकाने एकामागून एक हिट चित्रपट दिले. 2008 मध्ये बचना ए हसीनो, 2013 मध्ये रामलीला, ये जवानी है दिवानी (2013), तमाशा (2015), पीकू (2015), बाजीराव मस्तानी (2015), पद्मावत (2018).