सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट पसरलेली असून, कोरोनाबाधितांची वाढती संख्याही चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या संकटात अनेक चांगली माणसं आपल्याला सोडून जात असल्याचंही चित्र निर्माण झालंय. दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनू प्रिया यांचाही कोरोनानंच घात केल्याचं समोर आलं असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. आज पुन्हा एकदा या बातमीने मीडिया विश्व हादरले.
कनू प्रिया यांच्या जवळच्या असलेल्या बी. के. शिवानी यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिलीय. ”कनू प्रिया आता आपल्या सर्वांमध्ये नाही राहिली”. कनू प्रिया या एक प्रसिद्ध वृत्तनिवेदिकेबरोबर अभिनेत्री होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली होती. सर्वांच्या आशीर्वादांची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. कनू प्रियांच्या ऑक्सिजनची पातळी कमी होत होती आणि त्यांचा ताप वाढत होता. त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.