कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) लसीकरणा दरम्यान (Corona Vaccination) आता कोविशिल्ड (Covishield) वॅक्सिनसाठी 12 आठवड्यांनंतरच अपॉईंटमेंट मिळेल. केंद्राने रविवारी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट 84 दिवसांनंतरच दिली जाणार असल्याची माहिती दिली. त्याशिवाय, ज्या लोकांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी आधीच आपली अपॉईंटमेंट बुक केली असेल, तर त्यांच्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. जर अपॉईंटमेंट बुक झाली असेल, आणि कोणाला 84 दिवसांप्रमाणे बदल करायचा असल्यास, ते करू शकतात.
कोविशिल्ड वॅक्सिनच्या दोन डोसदरम्यान वाढवलेल्या वेळेदरम्यान आता कोविन पोर्टलमध्येही (CoWIN Digital Portal) बदल केले जाऊ शकतात.