टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबेर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यामुळे तिच्या लोकप्रियेत वाढ होत आहे. तिचे फॅन्स फॉलोअर्स वाढत आहे. अलीकडे तिचे इन्स्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. कमी वयात तिने फोर्ब्सच्या अंडर 30 आशिया यादीत आपले स्थान पटकावले आहे. तिने स्वतः ही माहिती दिली.
4 कोटी फॉलोअर्स झाल्यानंतर जन्नत हिच्या आनंदाला पारावार उरला नाही. जन्नत हिने तिची सर्वात मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्टही शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने एक फोटो शेअर करत ही माहिती दिली.
या यादीत 30 वर्षांखालील तरुणांना स्थान देण्यात आले आहे, जे व्यवसाय, स्टार्ट अप, कला आणि क्रीडा क्षेत्रात आपली चांगली कामगिरी करत आहेत. विशेष म्हणजे यात जन्नतला स्थान मिळाले आहे. इंस्टाग्रामवर फोर्ब्सचे पोस्टर शेअर करत तिने लिहिले की, ‘लहान वयात मिळालेली ही माझी सर्वात मोठी कामगिरी आहे. यासाठी फोर्ब्सचे खूप खूप आभार.
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी 20 वर्षीय जन्नत आपल्या कुटुंबासह दुबईला गेली होती. तिने आई-वडील आणि भावासोबत केक कापतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. जन्नत ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने 2010 मध्ये ‘दिल मिल गए’ या मालिकेतून आपल्या टेलिव्हिजन करिअरची सुरुवात केली. मात्र, ‘काशी: अब ना रहे तेरा कागज कोरा’ आणि ‘फुलवा’ या मालिकांनी तिला लोकप्रियता मिळाली. यानंतर ती भारतातील ‘वीरपुत्र- महाराणा प्रताप’ आणि ‘तू आशिकी’ सारख्या मालिकांमध्येही दिसली आहे. जन्नत शेवटची 2018 मध्ये ‘हिचकी’ सिनेमात दिसली होती. ज्यामध्ये तिने नताशा नावाच्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती.