सेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या २६ सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी (SET Exam 2021) 17 मे ते 10 जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यूजीसी महाराष्ट्र आणि गोवा (Goa) या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते. आतापर्यंत 36 वेळा सेट परीक्षा घेण्यात आली आहे.

गेल्यावर्षी करोनाच्या प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. ही परीक्षा सर्वात आधी नियमित वेळापत्रकानुसार 28 जून 2020 रोजी आयोजित केली जाणार होती, मात्र करोना संसर्गामुळे ती लांबणीवर पडली होती. एकूण 61114 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, यापैकी 4114 उमेदवार SET परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.

आता विद्यापीठाकडून 37व्या सेट परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. 26 सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण 15 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेविषयीची अधिक माहिती ttp://setexam.unipune. ac.in या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची सांगितले.

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये कोविड टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे आदेश, यूजीसीनं दिले आहेत. प्राध्यापक, शिक्षक , विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा टास्क फोर्समध्ये समावेश करावा अशा सूचना आयोगानं दिल्या आहेत.

यूजीसीनं कोविड टास्क फोर्सद्वारे शक्य होईल तितकी मदत करावी आणि समाजामधील विविध घटकांचं समुपदेशन करण्याचे आदेश यूजीसीनं दिले आहेत. युजीसीचे अध्यक्ष डॉ.डी पी सिंह यांनी विद्यापीठांना पत्रक पाठवलं आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठात कोविड हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.