टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मालिकेच्या सेटवर तुनिषानं गळफास घेत वयाच्या 20व्या वर्षी आपलं आयुष्य संपवलं. तुनिषावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अशातच आता आणखी एका आत्महत्येची घटना समोर आली आहे. 22 वर्षांची सोशल मीडियावर इन्फ्युएन्सरनं घराच्या छतावर गळफास घेत आत्महत्या केली आहे. लीना नागवंशी असं त्या मुलीचं नाव आहे. ती छत्तीसगडच्या रायगड येथे राहत होती. लीनाच्या आत्महत्येनंतर पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच तिच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह फासावरून खाली काढला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवण्यात आला आहे. लीनाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
लीना ही सोशल मीडिया स्टार असून सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिनं बी कॉम पर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. इन्स्टाग्रामवर तिला 10 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. पोलीस घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचली. केव्हा लीनानं घराच्या छपावर ड्रेसच्या ओढणीनं गळफार घेतला होता. ती जिवंत असेल या आशेनं तिच्या कुटुंबियांनी तिला घाली काढलं मात्र तिचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी लीनाचा फोटो मिळाला आहे. तसंच तिथं कोणतीही सुसाइड नोटही सापडलेली नाही. पोलिसांनी लीनाचा फोन जप्त केला असून फोनचा डेटा चेक केला जाणार आहे. लीनानं काही वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.