जगभरात कोरोना लसीच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा इशारा WHO ने दिला आहे.
इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चिंताजनक
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयियस यांनी दिलेल्या माहितीनुसार, WHO कडून कोव्हिड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी भारताला मदतही दिली जात आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते रुग्णालय, हजारो ऑक्सिजन केंद्र, मास्क आणि इतर वैद्यकीय सेवांचा पुरवठा केला जात आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती ही चिंताजनक आहे. भारतातील अनेक राज्यात कोरोना रुग्ण, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या, मृत्यूची संख्या वाढत आहेत. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल. कोरोना महामारीचं स्वरुप अधिक तीव्र होत असून त्यामुळे दुसऱ्या वर्षात कोरोनाचा विषाणू अधिक जीवघेणा होईल, असं टेड्रोस म्हणाले.
देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. रुग्णालयात जागाच नसल्यानं उपचारांअभावी रुग्ण प्राण सोडत आहेत. तर मरणानंतरही मृतदेहांचे हाल होत आहेत, असेही ते म्हणाले.