यंदा देशात नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे आगमन 1 जून रोजी होणार आहे. तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस 10 जूनच्या आसपास दाखल होईल. त्यापूर्वी आता राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. 12 मे ते 16 मे या पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख राज्य महाराष्ट्र, केरळ, गुजरातला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारने चक्रीवादळाला टाँकटाइ असं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कोदामेंडी आणि जवळपासच्या परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी पूर्वमोसमी पाऊस कोसळला. या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस सुरु होता. या दरम्यान काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. रामटेक शहरात ही अर्धा तास झालेल्या पावसात दहा मिनिटं मध्यम आकाराची गारपीट झाली. रामटेक आणि कोदमेंडी परिसरता झालेल्या पावसानं आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पाऊस ?
यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.