मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी घेतला घटस्फोट

प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेतलाय. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मागील 27 वर्षे सोबत प्रवास केला. आता वेगळे होत असल्याचं सांगितलं. बिल गेटस यांनी त्यांच्या मालकीची कॅस्केड इनव्हेस्टमेंटस कंपनी आणि मेक्सिकोमधील दोन कंपन्या मेलिंडा गेटस यांच्या नावावर 15 हजार कोटींची संपत्ती मेलिंडा गेटस यांच्या नावावर केली आहे.

कॅस्केड इनव्हेस्टमेंटस मेलिंडा गेटस यांच्याकडे

मेलिंडा गेटस यांच्या नवावर कॅस्केड इनव्हेस्टमेंटस,एफईएमएसओ आणि ग्रुप टेलेस्वियाची मालकी मेलिंडा गेटस यांच्याकडे देण्यात आली आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या रिपोर्टनुसार कॅस्केडनं कॅनडियन नॅशनल रेल्वे आणि ऑटो नेशन आयएनसी या दोनं कपन्या मेलिंडा गेटस यांच्याकडे सोपवल्या आहेत.

बिल गेटस यांनी कॅस्केड इनव्हेस्टमेंटसी निर्मिती केली होती. कॅस्केडकडे रिअल इस्टेट, ऊर्जा, हॉटेल व्यवसाय याशिवाय इतर 12 कंपन्यांची मालकी होती. मार्कर डेरे या शेती क्षेत्रातील अवजारे मशीन निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये 10 टक्के शेअर्स होते. त्याशिवाय रिपब्लिक सर्विसेस आयएनसी मध्ये देखील कॅस्केडची गुंतवणूक होती. बिल गेटस हे अमेरिकेतील सर्वात मोठे जमीनदार आहेत. वॉशिग्टनच्या मेदिनामध्ये त्यांचं 66 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर अलिशान निवासस्थान आहे. बिल गेटस हे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आहेत.

बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी संयुक्त पत्रकात म्हटलं, “आम्ही खूप विचाराअंती आणि आमच्या नात्यावर काम करुन अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षांच्या प्रवासात आम्ही 3 मुलांना वाढवलं आणि जगभरातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था उभी केली. आमचा त्या विचारांवर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही घटस्फोटानंतरही ते काम करणं सुरुच ठेऊ.” भविष्यातही सोबत काम करणार असलो तरी उर्वरीत आयुष्यात आम्ही कपल म्हणून एकत्रित राहू शकत नाही. आम्ही एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आम्हाला यासाठी अवकाश आणि खासगीपण द्यावं हीच विनंती,” असंही बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी आपल्या पत्रकात म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.