राम मंदिर उद्घाटनदिनी ‘या’ राज्यांमध्ये ‘ड्राय डे’ घोषित; शाळाही राहणार बंद
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु असून २२ जानेवारी रोजी इथं रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जावा असं आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. यापार्श्वभूमीवर आता याच दिवशी छत्तीसगड, आसाम , उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यांमध्ये संपूर्ण दिवस ‘ड्राय डे’ असणार आहे.
“भाजपनं हिंदुंची माफी मागितली पाहिजे”; राणेंच्या शंकराचार्यांवरील विधानावरुन ठाकरे आक्रमक
नारायण राणे यांनी नुकतीच शंकराचार्यांवर एक टिप्पणी केली होती. यावरुन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांवर हल्लाबोल केला आहे. भाजप यांना पक्षातून काढून का टाकत नाही? असा सवाल करत याप्रकरणी भाजपनं हिंदुंची माफी मागितली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
चीनच्या दौऱ्यानंतर मालदीवच्या अध्यक्षांची वाढली ‘पॉवर’!
मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी मोठं वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरुन आलेल्या मुइझ्झू यांनी भारतावर निशाणा साधला आहे. कोणत्याच देशाला आमच्यावर दादागिरी गाजवण्याचा अधिकार नाही, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. आम्ही लहान देश असू पण, यामुळे तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपमध्ये गेले होते. या त्यांच्या दौऱ्यावरुन मालदीवच्या काही नेत्यांना मिरची लागली होती. त्यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालाय.
साधूंना मारहाण प्रकरणी 12 जणांना अटक; भाजप अन् तृणमूलमध्ये घमासान
अपहरणकर्ते समजून तीन साधूंना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील तीन साधू गंगासागर मेळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये जात होते. यावेळी ते अपहरण करण्यासाठी आलेत अशा संशयाने त्यांना स्थानिकांनी मारहाण केली होती. यावरुन राजकारण तापू लागलं आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलीया जिल्ह्यामध्ये साधूंना मारहाण झाली होती. या मुद्द्यावरुन राजकारण तापवलं जात आहे. भाजपने यावरुन तृणमूल काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. साधू आणि त्याचे दोन मुलं एका खासगी वाहनातून मकर संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी गंगासागार यात्रेला निघाले होते.
भाषण थांबवलं अन् महादेव जानकरांनी भुजबळांचे पाय धरले
शहरात ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होती. यावेळी सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, महादेव जानकार इत्यादी प्रमुख नेते सभेसाठी उपस्थित होते. यावेळी महादेव जानकर यांनी आपलं भाषण थांबवत छगन भुजबळ यांच्या चरणाचे आशीर्वाद घेतले आहेत. महादेव जानकर हे भाषण करण्यासाठी उभे होते. यावेळी भाषण थांबवत त्यांनी व्यासपीठावर असलेल्या छगन भुजबळ यांचे चरण स्पर्श केले. आज मुंडे साहेब हयात नाहीत. पण, छगन भुजबळ जिवंत आहेत. आम्ही तुमच्याकडे वडिलधारे म्हणून पाहतो. आज मी तुमचे पाय धरणार आहे. तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठी आम्ही जिवाचं पाणी करु, असं म्हणत ते भुजबळांच्या चरणी नतमस्तक झाले.
6 चौकार अन् 4 षटकार….! अर्जुन तेंडुलकरचा कहर पण थोडक्यात हुकल शतक
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या रणजी ट्रॉफीमध्ये गोव्यासाठी धुमाकूळ घालत आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनने चंदीगडविरुद्ध स्फोटक खेळी खेळली. त्याचे शतक हुकले असले तरी त्याने ज्याप्रकारे धडाकेबाज फलंदाजी केली, त्यामुळे सगळेच प्रभावित झाले. अर्जुन हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे आणि खालच्या फळीत त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने या सामन्यात 116.67 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.अर्जुन तेंडुलकरने 60 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. तो हळुहळू त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता, पण अर्सलान खानच्या चेंडूवर कुणाल महाजनने झेल घेत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
महेश बाबूच्या ‘गुंटूर कारम’ नं मोडलं ‘पुष्पाचं’ रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी 45 कोटींची विक्रमी कमाई!
साऊथच्या महेश बाबूच्या गुंटूर कारमनं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. त्यानं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केल्याचे दिसून आले आहे. याबाबत त्यानं अल्लु अर्जुनच्या पुष्पाचाही रेकॉर्ड ब्रेक केल्याचे सांगण्यात येत आहे.
अल्लु अर्जुनच्या पुष्पा द राईज नावाच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४४ कोटींची कमाई केली होती. तर महेश बाबूच्या गुंटूर कारमनं ४५ कोटींची कमाई करुन आपल्या नावावर वेगळा विक्रम केला आहे. त्याचे सगळीकडे कौतुक होत असून येत्या काळात हा चित्रपट तीनशे कोटींपर्यत मजल मारेल असेही बोलले जात आहे.
SD Social Media
9850603590