डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलना लोकसभेसाठी बहुजन वंचितची ऑफर ?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना बहुजन वंचित आघाडीने उमेदवारीबाबत चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या चर्चेसाठी सोमवार दि. ८ जानेवारी रोजी ते पुण्यात जाणार आहेत. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती आली असून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी मतदार संघाचे धावते दौरे दिवाळीपासून सुरू केले असून काँग्रेसची उमेदवारी प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनाच मिळेल असे संकेत आहेत.
दाऊदच्या चार संपत्तीपैकी दोन संपत्तीचा लिलाव, १५ हजारांच्या जमिनीला मिळाला २.०१ कोटींचा भाव
मुंबईतील १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्या कौटुंबिक मालमत्तांचा आज लिलाव झाला. चार मालमत्तांपैकी दोन मालमत्तेसाठी कुणीही रस दाखविला नाही. तर इतर दोन जागांसाठीचा लिलाव मुंबईत संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुंबके या गावात शेतजमीन आणि घर अशा स्वरुपात मालमत्ता आहेत. आज एका जागेची बोली २.०१ कोटींवर लागली तर दुसऱ्या मालमत्तेसाठी ३.२६ लाखांची बोली लागली. विशेष म्हणजे दोन कोटींना विकल्या गेलेल्या जमिनीची मूळ किंमत १५ हजार ४४० इतकीच होती, मात्र लिलावात चढ्या दरात त्याची विक्री झाली. तर ३.२६ लाख बोली लागलेल्या जमिनीची मूळ किंमत १,५६,२७० एवढी होती.
श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल
श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांविरोधात भाजपनं आव्हाड यांच्याविरोधात काल आंदोलन केलं होतं. यावेळी धीरज घाटे यांनी विश्रामबाग पोलिसांकडं आव्हाडांविरोधात तक्रार दिली होती. यावरुन कलम २९५ अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेछुट गोळीबारात गंभीर जखमी झालेला गुंड शरद मोहोळचा उपचारांदरम्यान मृत्यू
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. आज दुपारी कोथरूड परिसरात शरद मोहोळ वर गोळीबार करण्यात आला होता. बाईकवरुन हल्लेखोर आले होते. त्यांनी शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या.सह्याद्री रुग्णालयात शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता.
२२ तारखेला पंतप्रधान मोदी करणार पूर्ण दिवस उपवास?
अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. २२ जानेवारीच्या मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ तारखेला उपवास धरणार आहेत. सांगितलं जातंय, राम मंदिराशी संबंधित विधींमध्ये सहभागी होण्यासाठी हे व्रत ते ठेवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी ११ वाजता पहिली पूजा करतील.
धार्मिक विधींसाठी उपवास करण्याची पंतप्रधानांची पहिली वेळ नाहीये. यापूर्वी ५ ऑगस्ट २०२० रोजी जेव्हा राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता तेव्हाही त्यांनी उपवास केलेला.
रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी ( ५ जानेवारी ) सकाळी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ईडी आणि सीबीआयनं टाकलेल्या धाडीतील ९५ टक्के लोक विरोधी पक्षातील आहेत. त्यामुळे छापेमारीचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. ही पहिली वेळ नाही. यापूर्वी माझ्या बहिणींच्या घरावर ईडीची छापेमारी झाली आहे. आता रोहित पवारांवर ईडीची छापेमारी होत आहे.”
अयोध्या खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारींना मिळालं घरपोच निमंत्रण
अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या खटल्यात मुस्लिमांच्या बाजूनं पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटनं सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्यावतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अन्सारी यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण पत्रिका दिली. येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
सुझलॉन एनर्जीला मिळाला 225 मेगाव्हॅटचा नवा प्रोजेक्ट, शेअर्समध्ये तुफान वाढ
रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमधील कंपनी सुझलॉन एनर्जीने एव्हररिन्यू एनर्जीकडून 225 मेगावॅटची नवीन पवन ऊर्जा ऑर्डर मिळाली आहे.सुझलॉन तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील वेंगाईमंडलम आणि तुतीकोरीन जिल्ह्यातील ओट्टापीदारम इथे एव्हररिन्यू एनर्जीच्या साइटवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवरसह 75 विंड टर्बाइन जनरेटर बसवणार आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.सुझलॉन तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील वेंगाईमंडलम आणि तुतीकोरीन जिल्ह्यातील ओट्टापीदारम इथे एव्हररिन्यू एनर्जीच्या साइटवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर (HLT) टॉवरसह 75 विंड टर्बाइन जनरेटर बसवणार आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
3 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल! 1 लाखाचे झाले 51 लाख
शेअर मार्केटमध्ये मल्टीबॅगर स्टॉकमधील गुंतवणूक तुम्हाला कायम कमी वेळेत बंपर नफा कमवून देते. वारी टेक्नोलॉजीज हा असाच एक स्टॉक आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे.नुकतेच या शेअरमध्ये 5 टक्के अपर सर्किट लागले आणि हा शेअर 874.15 रुपयांच्या किंमतीवर बंद झाला. जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप 941.30 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 139.75 रुपये आहे.वारी टेक्नॉलॉजीजचे एकूण उत्पन्न सप्टेंबर तिमाहीत 80 टक्क्यांनी वाढून 13.7 कोटी झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 7.6 कोटी होते. दरम्यान, सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला 2 कोटींचा तोटा झाला, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 15 लाखांचा नफा झाला होता.
‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसची पॅरोलवर सुटका, गर्लफ्रेंडच्या हत्येनंतर ११ वर्षांनी तुरुंगाबाहेर
ब्लेड रनर अशी ओळख असलेल्या ऑस्कर पिस्टोरियसची ११ वर्षांनी पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. ऑस्कर पिस्टोरियसने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याप्रकरणी तुरुंगात धाडण्यात आलं होतं. ११ वर्षांपूर्वी त्याला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. आता पॅरोलवर त्याची सुटका करण्यात आली आहे.
धोनीची करोडोंची फसवणूक, कॅप्टन कूलने दाखल केला FIR
भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. धोनीच्या व्यावसायिक भागीदाराने 15 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या सौम्या बिस्वास आणि मिहिर दिवाकर यांच्याविरोधात रांची कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.जागतिक स्तरावर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी दिवाकरने एमएस धोनीसोबत करार केला होता. त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या होत्या, मात्र मिहीर दिवाकर यांनी दिलेल्या अटी पाळल्या नाहीत.दिवाकरला अर्का स्पोर्ट्स फ्रँचायझीची फी भरायची होती आणि नफा वाटून घ्यायचा होता, पण त्याने तसे केले नाही. यामुळे धोनीला खूप त्रास सहन करावा लागला. यामुळे धोनीचे 15 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे
टी-20 वर्ल्ड कपचं शेड्युल जाहीर; इंडिया-पाकिस्तानचा सामना रंगणार
टी-20 वर्ल्ड कप 2024 ला अजून काही दिवस उरले नाहीत. या स्पर्धेची उत्सुकता 5 महिन्यांनी सुरू होणार आहे. याचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं. भारतीय संघ 5 जूनपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर भारत-पाकिस्तान सामना 9 जून रोजी खेळवला जाणार आहे.
SD Social Media
9850603590