नाशिकमध्ये रोटरीची भव्य परिषद
रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेची भव्य परिषद नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि.६ व रविवार दि.७ जानेवारी रोजी ग्रेप काउंटी येथे होणाऱ्या रोटरी परिषदेत प्रमुख वक्ते गुरु गौरांगादास प्रभु मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर, दिग्गज दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, मेजर जनरल संजयकुमार विद्यार्थी, आयपीएस कृष्ण प्रकाश, भारती ठाकूर, पियुष सोमाणी, पल्लवी उटागी, भक्ती शर्मा आदी मान्यवर उपस्थितांना संबोधित करणार आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या गव्हर्नर आशा वेणूगोपाल यांनी ही माहिती दिली.
रोटरी क्लब ही सेवाभावी संस्था जगभरातील वंचितांच्या आणि दुर्लक्षित लोकांच्या समस्या निवारण करण्यासाठी कटीबद्ध आहे. सर्वांना शुद्ध पिण्याचे पाणी, मूलभूत आरोग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता रोटरी ही संस्था सातत्याने प्रयत्न करत असते.
रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेची भव्य परिषद नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि.६ व रविवार दि.७ जानेवारी रोजी ग्रेप काउंटी येथे होणाऱ्या रोटरी परिषदेत प्रमुख वक्ते गुरु गौरांगादास प्रभु मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर, दिग्गज दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, मेजर जनरल संजयकुमार विद्यार्थी, आयपीएस कृष्ण प्रकाश, भारती ठाकूर, पियुष सोमाणी, पल्लवी उटागी, भक्ती शर्मा आदी मान्यवर उपस्थितांना संबोधित करणार असल्याचे ही रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या गव्हर्नर आशा वेणूगोपाल यांनी सांगितले.