‘सीएचएम’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 23 पासून पेपर

अखेर ‘सीएचएम’ अर्थात शासकीय सहकारी व लेखा पदविका आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, येत्या 23 ऑक्टोबरपासून या परीक्षेचे पेपर होणार आहेत.

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात येते. 2020 ची ही परीक्षा 23, 24 व 25 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने सदर परीक्षा नाशिक येथील के.टी.एच.एम. कॉलेजमधील मराठी हायस्कूल येथील नवीन व जुनी इमारत या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत आणि ज्यांची निवड करण्यात आली आहे, असे उमेदवार पात्र असणार आहेत. परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांनी आपल्या ऑनलाईन युजर आयडीचा वापर करून प्राप्त करून घ्यावेत. अथवा प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त न झाल्यास परीक्षार्थीनी फी भरलेला फॉर्म व चलनाच्या प्रतीवरुन यादीतील त्यांचे नाव तपासून पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना आदी ओळखपत्रांद्वारे संबंधीत परीक्षार्थीना परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. परीक्षार्थींना परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या कार्यालयाच्या 0253-259155 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी कळविले आहे.

परीक्षेचे वेळापत्रक :


मॅनेजमेंट ऑफ को-ऑप हाऊसिंग सोसायटीज व अकाँट्स हा पेपर – 23 ऑक्टोबर 2021
ऑडिटिंग व हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ॲण्ड मॅनेजमेंन्ट इन को-ऑपरेशन हा पेपर – 24 ऑक्टोबर 2021
को-ऑपरेटिव्ह लॉज ॲण्ड अदर लॉज व को-ऑपरेटिव्ह बँकींग अँड क्रेडिट सोसायटीज हा पेपर 25 ऑक्टोबर 2021.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.