व्होडाफोन आयडिया प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवणार

दोन दिवसांपूर्वीच एअरटेलने प्रिपेड प्लॅनमध्ये दरवाढ करणार असल्याची घोषणा केली होती. एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन आयडियाने देखील आपल्या प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना देखील आर्थिक झळ बसणार असून, नवे दर येत्या 25 नोव्हेंबरपासून लागू केले जाणार आहेत. वर्तमान काळात व्होडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त प्रिपेड प्लॅन हा 75 रुपयांचा आहे, त्यामध्ये वाढ होऊन तो 99 रुपये इतका होणार आहे. म्हणजे व्हीआय नेटवर्क देखील आपल्या सर्व प्रिपेड प्लॅनची किंमत 20 ते 25 टक्क्यांनी वाढवणार आहे.

व्होडाफोन आयडियाच्या सुधारित दरानुसार 149 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनची किंमत 179 रुपये होणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग 300 एसएमएस आणि महिन्याला 2GB डेटा मिळणार आहे. तर 219 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवून 269 रुपये एवढी करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल दिवसाला 100 एसएमएस आणि दर दिवशी 1 जीबी इंटरनेट मिळेल. 299 रुपयांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 359 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल दिवसाला 100 एसएमएस आणि दर दिवशी 2 जीबी इंटरनेट मिळेल. अशा प्रकारे आयडिया व्हॉडाफोन आपल्या सर्वच प्रिपेड प्लॅनमध्ये जवळपास 20 ते 25 टक्के वाढ करणार आहे.

दरम्यान आयडिया व्होडाफोन प्रमाणेच भारती एअरटेलने देखील आपल्या प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सर्वच अनलिमिटेड प्लॅनच्या दरांमध्ये वाढ केली आहे. अनलिमिटेड प्लॅनचे दर 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. तर 28 दिवसांची मुदत असलेल्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो आता 99 रुपये करण्यात आला आहे. तसेच 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो 179 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच 219 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 265 रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीने केल्या या अचानक दरवाढीमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसण्याची शक्याता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.