पुणे मनपा च्या सौजन्याने व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हिमालयीन समर्पण ध्यान संस्काराचा” कार्यक्रम श्री गणेश कला, क्रीडा सभागृह, स्वारगेट, पुणे येथे नुकताच संपन्न झाला. हा कार्यक्रम पुणे येथील गणमान्य अधिकारी तसेच हिमालयन समर्पण ध्यानाचे साधकांसह एकूण 3000 हून अधिक श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , संदीप पाटील (गडचिरोली परिक्षेत्रपदी उपमहानिरीक्षक),
डॉ.नितीन वाघमोडे साहेब , विकास ढाकणे(अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष)), प्रभाकर देशमुख ,माजी सचिव महाराष्ट्र शासन .अंबरीश मोडक (डायरेक्टर, श्री शिवकृपानंद स्वामी फौंडेशन) अजित देशमुख उपायुक्त पुणे म न पा.,हिंदी सिने अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व इतर मान्यवर यांची उपस्थिती होती.
सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी एक साक्षात्कारी ऋषी आहेत. बालपणापासूनच ते सत्याच्या शोधात होते. ते संपूर्ण जीवन साधनारत होते, जवळजवळ 16 वर्षे त्यांनी हिमालयात ध्यान साधना केली. ते हिमालयातील हा अनुभूती प्रधान अमूल्य ध्यानयोग संस्कार 1994 सालापासून देश- विदेशांमध्ये नि:शुल्क वाटत आहेत.
श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन अंतर्गत “गुरुतत्व” संचलित हिमालयन ध्यान हा 800 वर्षा पासून हिमालयात विकसित ध्यानाचा संस्कार आहे, जो 1994 साला पासून पुज्य स्वामीजींद्वारा समाजात आणला गेला आहे.
हिमालयन ध्यान हा संपूर्ण मानवजातीसाठी प्रशस्त असा ध्यानाचा संस्कार आहे जो सर्व जाती, धर्म भाषा, लिंगभेद यांच्या पलीकडे आहे. हिमालयीन ध्यान आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतो. नियमित ध्यान केल्याने आपण अंतर्मुखी होतो आणि आपला स्वीकार भाव , सहनशीलता, आत्मविश्वास, क्षमाशीलता वाढण्यास मदत होते.
त्यामुळेच जगभरातील अनेक लोक या ध्यानाच्या संस्कारास अवलंब करीत आहेत. आज हिमालयन ध्यानाचे साधक 67 देशांमध्ये हे ध्यान करीत आहेत. हिमालयन ध्यानाचे आश्रम जगभरात यु. के., ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर इत्यादी अनेक ठिकाणी स्थापित झालेले आहेत. तसेच भारतात गुजरात, राजस्थान, गोवा, बंगलूरू व महाराष्ट्रात नागपुर जवळ बुटीबोरी येथे मध्यभारत समर्पण आश्रम स्थापित झाले आहे. स्वामीजींच्या मते, समाजात चार महत्त्वाचे स्तंभ आहेत ते म्हणजे, वकील, डॉक्टर , अधिकारी (पोलीस व प्रशासन) व राजनेता, ज्यांच्यावर आपला समाज अवलंबून आहे. व त्यांना सतत नकारात्मक वातावरणात रहावे लागते. त्यांनी ध्यान केल्यास त्यांचे आभामंडल विकसित होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. ध्यान आपल्याला संतुलीत करते. आपल्याला कार्यात सफलता मिळते. कारण संतुलित व्यक्ति चे प्रयत्न सदैव संतुलित असतात. स्वामीजींनी आपल्या सुगम भाषेमध्ये आध्यात्मिक जगतातील अत्यंत क्लिष्ट संकल्पना समजावून सांगितल्या व ध्यानाद्वारे जीवनात प्रगती करण्याचे अत्यंत सरळ मार्ग या शिबिरात सुचवले. आपल्या प्रवचनानंतर स्वामीजींनी सर्वांना ध्यानात अनुभूती प्रदान करून मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा श्री संदीप पाटील गडचिरोली परीक्षेत्र उप महान निरीक्षक IPS यांनी ध्यान मार्गाबद्दल सुरुवातीस त्यांचे अनुभव सांगून त्याचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमानंतर पुणे महानगरपालिका उपायुक्त अजित देशमुख यांनी श्री शिवकृपानंद स्वामीजी यांचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.