देशभरातील तब्बल 8.43 कोटी कामगारांची ई-श्रमवर नोंदणी

असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत देशभरातील तब्बल 8.43 कोटी कामगारांनी ई-श्रमवर नोंदणी केली आहे. यातील 80.24 टक्के कामगारांनी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन (CSC) पोर्टलवर नोंदणी केली, तर उर्वरीत कामगारांनी राज्य सेवा केंद्राच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. ई-श्रम पोर्टलवर कामगारांच्या नोंदणीमध्ये सीएससी महत्त्वाची भूमीका बजावताना दिसून येत आहे.

याबाबत बोलताना सीएससीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी यांनी म्हटले आहे की, कामगार मोठ्या संख्येने कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करत आहेत. सीएससी केवळ या कामगारांच्या नोंदणीचेच काम करत नाहीत, तर त्यांना विविध योजनांचे फायदे देखील समजाऊन सांगतात. योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते. या कामगारांसाठी सीएससीच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते.

असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टची निर्मिती केली आहे. जो कोणी व्यक्ती असंघटीत क्षेत्रामध्ये काम करतो तो ई-श्रम पोर्टवर नोंदणी करू शकतो. ई-श्रम पोर्टवर मोफत नोंदणी करता येते. या पोर्टलवर स्थलांतरीत कामगार, बांधकाम कामगार, शिवणकाम करणारे कामगार, नाव्ही, रिक्षाचालक, घरकाम करणारे मजूर, कचार गोळा करणारे कामगार, किरकोळ भाजी विक्रेते, फेरीवाले अशा सर्वच क्षेत्रातील कामगारांना नोंदणी करता येते.

18 ते 40 वयोगटातील कोणताही असंघटीत क्षेत्रातील व्यक्ती हा ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतो. ज्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. अशा कामगाराचा मृत्यू झाल्यास अथवा तो कायमस्वरूपी अपंग झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत देण्यात येते. तसेच तो जर जखमी झाला तर त्याच्या कुटुंबाला एक लाखांचा मोबदला मिळतो. ई-श्रम पोर्टवर नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, आणि बँक खाते क्रमांक या दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.