माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास
राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. १३ जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवलं होतं. आता या प्रकरणी विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने काही वेळापूर्वीच हा निर्णय दिला आहे.सीबीआयने न्यायालयाने सांगितलं होतं की, जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडला छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाणी मिळाल्या होत्या. हा एका षडयंत्राचा भाग होता. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आरोप सिद्ध झालेलं हे १३ वं प्रकरण आहे.यात राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणात एच. सी. गुप्ता आणि इतर दोन अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. JLD यवतमाळला कोर्टाने ५० लाखांचा दंडही ठोठावला आहे.
“मोदींची मणिपूरवर बोलायची हिंमत नाही आणि…”, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत आपल्या महाआघाडीला बेंगळूरूमध्ये झालेल्या बैठकीत ‘इंडियन नॅशनल डेव्हल्पमेंटल इनक्लुजिव्ह अलायन्स’ म्हणजेच ‘इंडिया’ असे नाव दिले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सडकून टीका केली. तसेच ईस्ट इंडिया कंपनीपासून दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन यांच्या नावाचा उल्लेख करत ‘इंडिया’ नावावर टीका केली. याला आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. ते बुधवारी (२६ जुलै) मुंबईत विधीमंडळाबाहेर बोलत होते.
कंत्राटी पोलीस भरती होणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत स्पष्टच सांगितलं
महाराष्ट्रातील पोलीस भरती कंत्राटी स्वरुपाची करण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन दिलं आहे. हे आपण तात्पुरते घेत आहोत, ही काही परमनंट अरेंजमेंट नाहीये, असं फडणवीस म्हणाले आहेत.मुंबई पोलीस दलातील 10 हजार शिपायांची पदं रिक्त आहेत. सेवानिवृत्ती, आंतर जिल्हा बदली, दरवर्षी 1500 पोलीस निवृत्त होतात पण 2019,2020,2021 मध्ये पोलीस भरती झालेली नाही. अपघात, आजार, कोरोनामुळे 500 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण राज्यात 14,956 शिपाई पदं, 2,174 शिपाई चालक पदं, तसंच एसआरपीएफची पदं भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 18,331 पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका; जमावाने सुरक्षा दलाच्या दोन बसेस पेटवल्या
मागील अडीच महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये संतप्त जमावाने सुरक्षा दलाच्या दोन बसेस पेटवून दिल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुधवारी अधिकाऱ्यांकडून याबाबतचा खुलासा केला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशीही माहिती मिळाली आहे.‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सायंकाळी सुरक्षा दलाच्या दोन बसेस दीमापूरहून येत होत्या. दरम्यान, सापोरमेईना येथे ही घटना घडली. संबंधित दोन्ही बसेस एका जमावाने आडवल्या. बसमध्ये आपल्या शत्रू जातीचा कुणी आहे का? याची चाचपणी जमावाने केली. यावेळी काही जणांनी दोन्ही बसेसला आग लावली. या घटनेत जिवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थिनीची अन्नासाठी वणवण
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थिनीची अन्न पाण्यावाचून वणवण होते आहे. या विद्यार्थिनीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तिच्या आईने तिला मदत मिळावी म्हणून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती केली आहे. अमेरिकेतल्या TRINE विद्यापीठात ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी गेली होती. मात्र ती शिकागो च्या रस्त्यांवर वणवण फिरताना आढळली. ही मुलगी हैदराबादची आहे. सईदा लुलु मिनहाज झैदी असं या मुलीचं नाव आहे.
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
सध्या छोट्या पडद्यावरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. टीआरपीच्या कारणामुळे या मालिका बंद होताना दिसत आहेत. अशातच आता ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ लवकरच प्रेक्षकांची रजा घेणार आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेने १००० भागांचा टप्पा पूर्ण केला असून आज या मालिकेचे शेवटचे चित्रिकरण पार पडले. यानिमित्ताने संपूर्ण टीमने एकत्र येऊन हा क्षण साजरा केला. त्यासंबंधिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
अक्षय कुमारचा ‘OMG 2’ अडचणीत; चित्रपटावरील तब्बल 20 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
अक्षय कुमारचा ‘OMG 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. ‘OMG 2’मधील कथा जाणून चाहत्यांमध्ये उत्सुकता तर आहेच पण अक्षयच्या एकूण लूकवरून काही प्रेक्षक त्याच्यावर नाराज देखील झालेत. नेटकऱ्यांनी अक्षयला हिंदू धर्माची खिल्ली न उडवण्याचा सल्ला देखील दिला. त्यातच सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाच्या रिलीजवर सध्या बंदी घातली असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर येत आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या रिव्हाइजिंग टीमने हा सिनेमा पाहिला. स्क्रिनिंगला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी स्वतःही उपस्थित होते. काही दिवसनापूर्वी सेन्सॉर बोर्डानं चित्रपटावर तात्पुरती बंदी घातली होती. तर आता निर्मात्यांना चित्रपटात 20 कट सुचवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर चित्रपटाला A म्हणजेच ऍडल्ट प्रमाणपत्र देण्यात आलं असल्याची माहिती आहे.
SD Social Media
9850 60 3590