आपण कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो : पी. चिदंबरम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे. नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फयादा झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पहिल्यांदा आपल्या पंतप्रधानांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर मोदींनी निर्णय बदला, नोटबंदीचा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे आपन कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना चिदंबरम म्हणाले की, देशातील काळा पैसा वापस मिळावा आणि कॅशलेस व्यवाहारांना चालना मिळावी म्हणून नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. नोटबंदीनंतर कुठलाही काळा पौसा बाहेर आला नाही. एवढेच नव्हे तर, नोटबंदी जेव्हा करण्यात आली तेव्हा देशभरात 18 लाख कोटी रुपये चलनामध्ये होते. तर आता सध्या 28.5 लाख कोटी रुपये चलनामध्ये आहेत. म्हणजेच मोदींचा दुसरा उद्देश देखील फसल्याचे दिसून येते. मात्र नोटबंदीनंतर काही प्रमाणात डिजिटल व्यवहार वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून नुकताच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डीझेल10 रुपयांनी कमी झाले. मात्र यावरून देखील चिंदबरम यांनी केंद्रावर टीका केली. 2020-21 मध्ये केंद्राला उत्पादन शुल्कामधून 3,72,000 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर आता उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.