एअर इंडियाला रुळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल : रतन टाटा

तब्बल 18000 कोटी रुपये मोजून अखेर टाटा सन्सने एअर इंडिया खरेदी केली आहे. त्यामुळे 68 वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात आली. मात्र, एअर इंडियाची सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात या कंपनीला रुळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल, असे मत रतन टाटा यांनी व्यक्त केले.

सध्याच्या घडीला एअर इंडियाच्या डोक्यावर तब्बल 15000 कोटींचे कर्ज आहे. याशिवाय, भारतातील हवाई सेवा क्षेत्रात एअर इंडियाला अनेक खासगी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचा गाडा पुन्हा रुळांवर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील. त्यासाठी देशातील हवाई सेवा क्षेत्राकडून टाटा समूहाला सहकार्य मिळण्याची गरज असल्याचे रतन टाटा यांनी म्हटले. टाटा समूहाने एअर इंडियाला 18000 कोटींमध्ये खरेदी केले आहे. या कराराअंतर्गत टाटा समूह विमान कंपनीचे 15300 कोटी रुपयांचे कर्ज फेडेल आणि सरकारला 2700 कोटी रुपये रोख म्हणून मिळतील.

तसेच रतन टाटांनी यावेळी जेआरडी टाटांच्या आठवणींनाही उजाळा दिलाय. जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता. आधीच्या वर्षांमध्ये मिळालेली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची संधी टाटाला मिळेल. जेआरडी टाटा आज आमच्यामध्ये असते, तर त्यांना खूप आनंद झाला असत, असंही टाटांनी ट्विटमध्ये म्हटलंय. खासगी क्षेत्रासाठी निवडक उद्योग उघडण्याच्या सरकारच्या अलीकडील धोरणाबद्दल आपण ओळखले पाहिजे आणि आभार मानले पाहिजेत, असे सांगत एअर इंडियाचे रतन टाटा यांनी स्वागत केले.

एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती, ज्याचे नंतर टाटा एअरलाईन्स असे तिचे नामकरण करण्यात आले. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल 1932 मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल घेऊन जाण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Nevill Vintcent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रासदरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने 2,60,000 किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी 155 प्रवाशांनी प्रवास केला आणि 9.72 टन मेल आणि 60,000 रुपयांचा नफा मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.