900 अंकांनी कोसळलं शेअर मार्केट, 4 लाख कोटींचं नुकसान

एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे गुंतवणूकदारांना मात्र मोठा धक्का बसला आहे. भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. अचानक सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला. त्यामुळे 4 लाख कोटी रुपयांचं नुकसान काल शेअर बाजार बंद होताना झालं आहे. यामुळे शेअर मार्केटमधील टेन्शन आणखी वाढलं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या आर्थिक मंदीचं सावट आहे. याशिवाय तिथल्या बाजारपेठेतून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बुधवारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 1.5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार शेअर बाजारात आज सर्वात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. यासह, अस्थिरता निर्देशांकात आज 11 टक्क्यांहून अधिक उसळी नोंदवण्यात आली.

शेअर बाजार कोसळल्याने आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे ३.८८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज, बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 261.33 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं आहे.शेअर बाजारात मंगळवारी 265.21 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर होते. त्याच वेळी, गेल्या 4 दिवसांच्या घसरणीत, गुंतवणूकदारांचा तोटा वाढून 7 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

अदानी समूहाच्या शेअर्सची विक्री, परदेशी बाजारातील घसरण, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे मिटिंग मिनिट्स जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांची सावध भूमिका बाजारात पाहायला मिळाली. याशिवाय जिओ पॉलिटिक्स आणि आर्थिक मंदीचे संकेत देखील शेअर बाजारावर परिणाम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.